जागतिक टपाल पेटी दिन


आमच्या वेळेला आम्ही लहान होतो तेव्हा घराघरांमध्ये आठवणी, सुख दुःखाचे निमंत्रण आणि निरोप घेऊन जाणारी लाल पोस्टाची पेटी आता पडद्याआड झाली आहे.

ती आता इतिहास जमा झाली आहे. 

पोस्टाची पेटी आता कालबाह्य झाल्यामुळे काढून टाकल्या जाणार. 

वर्षानुवर्ष घरात िरोप म्हणजेच पत्र कार्यालयीन पत्रे कागदपत्रे, राख्या ,तिळगुळ, भेट कार्ड आणि बरच काही एका गावातून दुसऱ्या शहराकडे पोहोचवण्याचे काम देशभरात प्रसंगी देशाच्या बाहेरही पोहोचवण्याचे काम या पोस्टाच्या पेटी मार्फत होत होते.

पोस्टाच्या पेटीमध्ये किती प्रकारचे निरोप लिहिलेली पत्रे, चिठ्ठ्या, कागदपत्रे कार्ड असतील. 

एखादा दुःखद बातमी पत्र लिहिलेलं कुणाचे तरी आग्रहाचे निमंत्रण पडलेले असेल. 

दिवाळी आली आहे तर एकत्र आपण साजरा करू. असे प्रकारचे अनेक पत्र त्यामध्ये असत. 

परदेशामध्ये स्थायिक झालेला मुलांना लवकर भेटायला या असा निरोप सुद्धा या पत्रांमध्ये असू शकतो. 

सीमेवर लढण्यासाठी गेलेले सैनिक आपल्या कुटुंबाला देखील पत्र लिहायचे ते पत्र सुद्धा यामध्ये असू शकतात. 

पहिल्यांदाच नोकरी मिळाली. लवकर भेटायला या असा निरोप लिहिणाऱ्या वृद्धा आई-वडिलांना मुलांना भेटण्यासाठी पत्र लिहिलेले असेल. 

एकाच पेटीत असे विरोधाभास असलेले अनेक पत्र त्या टपाल पेटी मध्ये असत. तिथून पोस्टमन च्या पिशवीत काही काळ तरी एकत्र असतील. 

अशा सगळ्या निरोपांना एकत्र ठेवणारी फक्त पोस्टाची पेटी होती. 

या पोस्टाच्या पेटीतून अनेक निरोप घेऊन येणारा पोस्टमन त्याचे आतुरताने आपण वाट बघणारे डोळे पत्र आल्यावर अधुरतेने असणारे त्या पत्राचे वाचक आणि त्या पत्राबरोबर जोडलेल्या कित्येक आठवणी होत्या. 

ही पत्राची पेटी आता हद्दपार होत आहे. 

नव्या पिढीला ते कदाचित माहिती असणार नाही. अतिशय गतिमान झालेले जग आणि त्या गती बरोबर पाऊल ठेवणारी जनरेशन नेक्स्ट. या जलद रीतीने धावण्याची अनेक कारणे आहेत. घड्याळाच्या काट्यांबरोबर धावताना अनेक साधने नव्याने निर्माण झालेली आहेत जी गतीला पूरक ठरत आहेत. 

संगणक संगणकाद्वारे पाठवलेले मेन्स मोबाईलचा शोध आणि जगभरात झपाट्याने लोकांनी त्याचा केलेला स्वीकार हे कारण असू शकते. मोबाईलचे गारुड अवघ्या जगावर पडण्याचे कारण म्हणजे वेळेची बचत होय. 

पत्राद्वारे पाठवणारे निरोप हे तीन-चार दिवस लागत होते. परंतु मोबाईल मुळे ते अगदी दोन-तीन मिनिटातच समोरच्या व्यक्तीला कळते. क्षणभरातच सगळ्या बातम्या आपल्या नातेवाईकांना आपण पोहोचवू शकतो. 

कुरियर सेवा, ई-मेल फॅक्स, 

याद्वारे संदेश वाहनाचा प्रवास हा मोबाईल वर येऊन आणखीन जलद आणि सोपा झालेला आहे. 

वेळेवर असो आणि हमखास निरोप आणि त्यासाठी ने संपर्क या दोन अतिशय ठळक आणि महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे समाजाच्या प्रत्येक स्तरावरील लोकांकडे हे साधन उपलब्ध आहे. 

याशिवाय राख्या इतर सामान पाठवण्यासाठी खाजगी कुरिअर सेवा कंपन्या ट्रेकिंग सुविधा सह उपलब्ध असतात आणि हेच मोठे कारण आहे पोस्टाच्या पत्राची गरज न वाटण्याचं आणि पर्यायाने ते नामशेष होण्याचं याचा परिणाम म्हणून आंतरदेशीय पोस्ट कार्ड पाकीट या गोष्टी केव्हाच कालबाह्य झाल्या आहेत. 

आजही रजिस्टर एडी हे साधन सरकारी आणि खाजगी क्षेत्रांमध्ये विश्वासाचे समजले जाते. 

म्हणूनच एक सप्टेंबर पासून रजिस्टर पोस्ट आणि स्पीच पोस्ट यांचे एकत्रीकरण करून पत्राला गती देण्याचा प्रयत्न होणार आहे. 

रजिस्टर टपाल जलद गतीने पोहोचणार या प्रकारच्या बदलामुळे अगदीच ठप्प पडून पाहणाऱ्या टपालाला स्पीड मिळेल याशिवाय टपाल पोस्ट असल्याचे ते प्राप्त करताच्या सहि निशित पावती मिळते.

आजपर्यंत अशा पावत्या अनेक बऱ्याच द्या न्यायदानाच्या कामात पुरावे सरकारी दस्तऐवज म्हणून वापरल्या गेल्या आहेत. 

म्हणजेच जुन्या पत्राला नवीन रोप मिळणार पण यामध्ये लाल पोस्टाच्या पेट्यांचा उपयोग होणार नाही कधीमधी येणारा पोस्टमन आता येणारच नाही. 

1854 मध्ये लॉर्ड डलहौसी याने भारतामध्ये आधुनिक टपाल पेटीची सुरुवात केलेली होती. ब्रिटिशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी त्यांनी पोस्ट कार्यालय आणि पोस्टाच्या पेट्या उभारलेल्या होत्या. 

खरंतर ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी भारतात टपाल सेवा सुरू केलेली होती. 

काही काळाने देशांमध्ये अनेक ठिकाणी कालांतराने देशभर टपाल सेवेचा प्रसार झाला लॉर्डन हाऊस यांनी डबल सेवेसाठी कायदा करून कायदेशीर एक समान टपाल सुरू केलेले होते.

इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यावर सोडून भविष्य वेध घ्यावा हेच खरे. जुने सोडून द्यावे आणि नवे घ्यावे हा नियम सध्या लागू होतो. 

171 वर्षांचा इतिहास असलेली पोस्टाची पेटी बंद होणार या बातमीमुळे वाईट सगळ्यांनाच वाटले. 

पण नव्याचे स्वागत पण व्हायला पाहिजे. 

कोणतेही नवीन स्वीकाराला वेळ लागतो पण ते स्वीकारले जाते एवढे मात्र निश्चित. 


श्रुती पवार. महाराष्ट्र रत्न.


.

Post a Comment

0 Comments