लातूर येथील प्रसिद्ध ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ. विक्रम विलास सुर्यंवंशी यांचा दैनिक शिवजागरच्या वतीने कार्यकर्तृत्व गुण गौरव सन्मान

लातूर येथील प्रसिद्ध ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ. विक्रम विलास सुर्यंवंशी यांचा दैनिक शिवजागरच्या वतीने  कार्यकर्तृत्व गुण गौरव सन्मान

लातूर | प्रतिनिधी : लातूर येथील प्रसिध्द ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ. विक्रम विलास सुर्यंवंशी यांचा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपादिका सौ. स्वाती चव्हाण यांच्या वतीने कार्यकर्तृत्व गुण गौरव करुन सन्मानित करण्यात आले. डॉ. विक्रम सुर्यवंशी यांनी वैद्यकिय क्षेत्रात तर आपला ठसा उमटवलाच आहे शिवाय त्यांनी सामाजिक भावना जपत  त्यांचा वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक कार्यातही हातभार लावण्यात नेहमीच सिंहाचा वाटा राहिला आहे . आपली शरीरयष्टी निरोगी रहावी यासाठी ते स्वत: सायकलींग बाबत जनजागृती करतात व स्वत: ते सायकलींग करुन त्यांनी अनेक स्पर्धेच्या माध्यमातून मेडल जिंकलेले आहेत. विविध शिबीरांचे आयोजन करुन जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे हा त्यांचा जणू छंदच आहे. समाजसेवेचं विधायक कार्य त्यांनी हाती घेतलेले पाहून सर्वच स्तरांतून त्यांचं नेहमीच कौतुक आजवर होत आले आहे. त्यांचा शांत व निरागस स्वभाव असल्यामुळे त्यांच्याकडे आलेला रुग्ण हा तात्काळ बरा होतो हे त्यांचे एक विशेष वेगळेपण आहे आणि ते त्यांनी आजवर जपलं आहे हे तितकंच महत्वाचं आहे. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकाळामध्ये अनेक विविध मोठया अवघडातील अवघड शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत त्याबद्दल त्यांची विविध स्तरांतून प्रशंसा नेहमी असतेच. आई वडीलांच्या विचारांचे ते अतिशय पाईक आहेत आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळेच आज त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे हे तितकंच महत्वाचं आहे. वैद्यकीय सेवा देत असतांना त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून माईर्स एमआयटी येथील यशवंतराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालाय येथे भारताचे भवितव्य असणारी वैद्यकीय पीढी घडवण्याचं विधायक सेवाकार्य त्यांनी हाती घेतलं आहे. या सर्व त्यांच्या कार्यकिर्दीचा आलेख लक्षात घेऊन दैनिक शिवजागर यांनी त्यांच्या या सेवेची व विधायक कार्याची दखल घेतली आहे व त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा कार्यकर्तृत्व गुण गौरव करुन त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान लातूर येथील त्यांचे आशिर्वाद ऑर्थोपेडीक व प्लास्टीक सर्जरी हॉस्पीटल येथे केला आहे. या त्यांच्या कार्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. प्रसंगी संपादक सौ. स्वाती चव्हाण, सृष्टी चव्हाण व सृजन चव्हाण यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments