बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल, लातूर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा


बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल, लातूर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा


लातूर : दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल, लातूर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या असेंबलीमध्ये प्राचार्यांना राखी बांधण्यात आली. सर्व वर्गातील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शाळा परिसरात झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या चार गटांनी  शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन, गांधी चौक पोलीस स्टेशन, विवेकानंद रुग्णालय, एनसीसी बटालियन या ठिकाणी जाऊन पोलिस अधिकारी, डॉक्टर, रुग्ण व इतर सेवा बजावणाऱ्या व्यक्तीस राख्या बांधल्या. विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे सर्वांनी खूप कौतुक करून त्यांना मिठाई व विविध पुस्तके भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments