युसूफवडगाव/रामवडगाव,
– समाजाभिमुख दृष्टीकोनातून वैद्यकीय सेवा देणारे राजमुद्रा मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष व कार्ला येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता तपसे यांनी आपला ३४ वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. श्री क्षेत्र रामवडगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य शिबिरात तब्बल १५०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात नेत्र तपासणी, कर्करोग तपासणी, रक्त चाचणी, मधुमेह, रक्तदाब आदींचा समावेश होता. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी हा उद्देश शिबिरामागे होता. या शिबिरासाठी विविध तज्ञ डॉक्टरांनी आपले मोलाचे योगदान दिले. यामध्ये वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. केशव सारुक, हाडाचे तज्ज्ञ डॉ. कोठावळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. बचूटे, एस.आर.टी.एम. चे डॉ. नितीन साखरे, डॉ. सुमेध वागमारे, डॉ. समाधान घुगे, डॉ. रंगनाथ आदनाक, डॉ. राहुल मुंडे, प्राथमिक आरोग्य केंद्र राजेंगावचे डॉ. नवनाथ घुले, सीएचओ डॉ. शीतल डोईफोडे, डॉ. सुमित मुंडे, केज उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. समाधान घुगे व डॉ. सचिन राऊत, ससून हॉस्पिटलचे जनरल सर्जन डॉ. अन्तेश्वर वडमिलवार, डोळ्याचे तज्ज्ञ डॉ. अविनाश अघोर, श्रीशा फार्माचे अविनाश बोराडे यांचा समावेश होता.
याशिवाय 108/102 धाराशिव जिल्हा कोऑर्डिनेटर ऍड. जयराम शिंदे, लालासाहेब ढाकणे, ज्ञानेश्वर गिरी, विशाल शिंदे, प्रीतम बचूटे, बाप्पासाहेब सोनवणे व प्रा. अशोक देवकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती
या भव्य शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई मराठवाडा प्रवक्ते व युवा नेते ज्ञानेश्वर गिरी, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. मल्लिकार्जुन गडकर, वृक्षवली सेवाभावी संस्थेचे सचिव राहुल केंद्रे, रामराव फाऊंडेशनचे सचिव बन्सीलाल भालेराव, युवा नेते किरण सातपुते, नितीन बचूटे, लिंगेश्वर लांमतुरे, किरण जावळे, बाप्पासाहेब सोनवणे, सर शंभू चोपने, श्री. रमेश तपसे, बाळकृष्ण तपसे, अशोक देवकर सर, सतीश चांबारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी डॉ. तपसे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम
आरोग्य शिबिराव्यतिरिक्त डॉ. तपसे यांनी जिल्हा परिषद शाळेतील 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. याचबरोबर गावातील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. गडकर यांचा सत्कार, आशा व अंगणवाडी सेविकांचा गौरव तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
या उपक्रमामुळे डॉ. तपसे यांच्या कार्याची पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रशंसा केली.
“समाजाने मला दिलेल्या प्रेमाचे ऋण मी कधीही विसरणार नाही. डॉक्टर म्हणून फक्त रुग्णोपचारच नव्हे तर गाव, शाळा, पर्यावरण आणि सामाजिक कार्य यासाठी आपले कर्तव्य पार पाडणे हे माझे ध्येय आहे. माझा वाढदिवस हा फक्त माझा नाही तर संपूर्ण गावाचा आनंदोत्सव असावा, या हेतूने मी हा दिवस आरोग्य शिबिर आणि सामाजिक उपक्रमांना वाहून घेतला आहे. पुढेही समाजोपयोगी कार्य अधिक जोमाने करत राहणार आहे.” – डॉ. दत्ता तपसे
“डॉ. दत्ता तपसे यांनी आरोग्य शिबिर, शालेय साहित्य वाटप आणि सामाजिक गौरव अशा बहुआयामी उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या कार्यात सेवा, संवेदनशीलता आणि समाजहिताची खरी भावना दिसून येते. अशा तरुण डॉक्टरांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.”
– अॅड. शंकर चव्हाण, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय
ग्रामस्थांची कृतज्ञता
या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना मोफत तपासणी व उपचाराचा लाभ झाला. आरोग्य सुविधांची कमतरता असलेल्या ग्रामीण भागात असे शिबिर मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरले. गावकऱ्यांनी डॉ. तपसे यांना मनापासून धन्यवाद दिले. डॉ. दत्ता तपसे यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त झालेले आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम हे केवळ कार्यक्रम नसून समाजसेवेची खरी दिशा दाखवणारे आहेत. ग्रामविकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमांमुळे त्यांचे नाव पंचक्रोशीमध्ये सेवाभावी डॉक्टर म्हणून अधिकच उजळले आहे.

0 Comments