परीक्षा संपली आणि सुट्टी ची मज्जा चालू झाली.

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय काय करायचे. हे मुलांचे प्लॅन आता सुरू झाले. परीक्षा झाल्यानंतर आता काय करायचे हा प्रश्न अनेकांसमोर असतो. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत पाचवीतील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी कृती कार्यक्रम घेण्यासाठी निर्णय शासनाने घेतलेला आहे पण त्यामुळे या मुलांना  सुट्टीचा आनंद किती मिळेल हे मात्र सांगता येत नाही. 

मुलांच्या सामाजिक वाढीवर शारीरिक वाढीवर आणि भावनिक वाढीवर त्याचा परिणाम नक्की होईल. मोबाईल गेम सोशल मीडियाचा वापर अशा अनेक 

तक्रार आपण करत असतो आणि त्याचवेळी त्यांना खुले आकाश मिळवून देण्याची गोष्टीवरही आक्रमण करतो हे कितपत योग्य वाटते.

मुलांना सुट्टी मध्ये आजी आजोबांकडे तसेच काका काकू कडे मामा मामीकडे जायचे असते. आजीच्या हातचा खाऊ, तसेच गप्पा गोष्टी, त्यांना करायच्या असतात. दिवसभर मस्ती करणे, मौज मजा करणे, सायकलिंग करणे, क्रिकेट खेळणे, कॅरम खेळणे, अशा अनेक गोष्टी मुलांना करायच्या असतात. बैठे खेळ सुद्धा त्यांना खेळायचे असतात. 

काळाप्रमाणे यातल्या संकल्पना बदललेल्या असतात. 

यंदा सुट्टीचा आनंद मात्र लहान मुले मुकणार आहे कारण राज्य शासनाच्या निर्णयानुसार एक आदेश आत्ताच जारी केलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानाचे कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण भारत (महाराष्ट्र) योजनेअंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याचे ठरवले आहे. 

शालेय अध्ययनात मागे पडलेल्या दुसरी ते पाचशे विद्यार्थ्यांनी पाच मार्च ते 30 जून पर्यंत शाळेत येऊन गणित आणि मराठी या विषयांचा अभ्यास करणे अशी अपेक्षा आहे. 

मे महिन्याचा सुट्टीचा सदुपयोग व्हावा या दृष्टीने हे प्रयत्न आहेत .त्यामुळे मुलांचा सुट्टीचा बेत ही रद्द करावा लागणार आहे.

असर च्या अहवालानुसार आपण जाणतोच की आठवीच्या मुलांना दुसरी तिसरीच्या क्षमतेचे वाचन सुद्धा करता येत नाही किंवा सोपी गणित ही देखील सोडवता येत नाही . चार वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थही त्यांना सांगता येत नाही.

यासाठी शासनाने हा उपाय केलेला आहे. तात्पुरती मलमपट्टी करण्यासारखे आहे. 

त्यासाठी शिक्षकांना देखील सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे. 

जर शिकवतानाच मुलांनी व्यवस्थित लक्ष दिले आणि शिक्षकांनाही त्यांना जर व्यवस्थित मार्गदर्शन केले. तर सुट्टी ही शिक्षकांना देखील मिळेल आणि मुलांना देखील. परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. आधी शाळेत शिकवण्या व्यतिरिक्त इतर सरकारी कामांमध्ये शिक्षक गुंतलेले असतातच.

आजार माहिती झाल्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपचार करणे गरजेचे असते पण प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही येणाऱ्या अडचणी शिक्षकांची मानसिकता तसेच मुलांवर येणारा ताण याचाही विचार व्हायला पाहिजे. 

मानसिक विकासाचं काय? 

जास्त अभ्यासामुळे मुलांची गुणवत्ता सुधारल्याचे 

 अहवाल हे सरकार दरबारी जमा होते परंतु वस्तू स्थितीप्रमाणे अहवालानुसार नसते. 

मुलांच्या शारीरिक मानसिक विकासाचं काय? अशा अभ्यास वर्गाहून आल्यावर मुले आपला आनंद मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम तसेच मुलांमध्ये रमणे. कोरोनामुळे मुलांना ज्या स्क्रीनची सवय झालेली आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग शोधून आणण्यासाठी मग पुन्हा आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागणार आहे. मुलांना वाचनाची गोडी 

तसेच सरकारी शाळांमध्ये असे साधन सामग्री पुरवली जाते त्याचा योग्य वापरतो होतोच शिवाय शिक्षकांनी आपल्या विषयाच्या प्रत्येक तासाला मुलांच्या मदतीने स्वतः विकसित करणे गरजेचे आहे. 

एक तर वर्षभर मुलं शाळेमध्ये जाऊन सुट्टीची वाट पाहत असतात. आणि सुट्टी न मिळाल्यामुळे त्यांची चिडचिड मात्र होणार आहे. 

कारण मनाला थोडी शांतता आणि करमणूक ही प्रत्येकाला हवी असते. 

शाळेत असतानाही अभ्यास आणि सुट्टीत असतानाही अभ्यास मुले मात्र या गोष्टीमुळे हँग होतील एवढे मात्र खरे. 

पालकांनाही त्यांना सांभाळणे अशावेळी कठीण होते. 

फक्त अभ्यासू किडा न करता बाकीच्या गोष्टींमध्ये रमणे देखील गरजेचे आहे असे वाटते.

श्रुती सुनील पवार. महाराष्ट्र रत्न. 

7020260192

Post a Comment

0 Comments