आपण बघतो वृद्धाश्रमा मध्ये अनेक वयस्कर लोक आहेत.
मी ज्या वृद्धाश्रमाला भेट दिली होती त्यामध्ये खूप वयस्कर स्त्रिया आहेत आणि वयस्कर बाबा देखील आहेत. इतकेच काय तर दोन-तीन तरुण मुली, आणि छोटी मुलं देखील मला दिसली.
या वृद्धाश्रमामध्ये खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते. त्यांच्या मनाची काळजी देखील घेतली जाते. त्यांच्यासाठी गाण्याचे कार्यक्रम ठेवले जातात.
तसेच ज्यां लोकांचा वाढदिवस आहे ते लोक देखील या लोकांना आपल्या आनंदात सामील करून घेण्यासाठी तेथे त्यांना भोजन देतात. त्यामध्ये सर्व चांगले जेवण असते. गोड सुद्धा असते.
आणि ज्या लोकांकरता जेवण ठेवलेले आहे. त्यांच्यासोबत हे लोकं जेवतात. थोडी तरी माणुसकी आत्ता तरी राहिलेली आहे.
पण तुम्हाला असा प्रश्न पडतो का? की बातम्यांमध्ये म्हणा किंवा वृद्धाश्रमात गेल्यावर आपल्या निदर्शनास येते की रोज 150 ते 200 लोक वृद्धाश्रमात आणून टाकले जातात.
इतके का नकोसे झालेले आहेत घरामध्ये वृद्ध व्यक्ती. हा प्रश्न मला कायम पडतो.
मान्य आहे की आजकालच्या मुली नोकरी करतात. घरातली मुलं मिस्टरांचे करणे ही जबाबदारी पार पाडून परत घरामध्ये वृद्धांची देखील जबाबदारी पार पाडावी लागते म्हणून का काय वृद्धांना वृद्धाश्रमा मध्ये पाठवले जाते. हे कितपत योग्य वाटते.
मान्य आहे आज-काल परिस्थिती ही पहिल्यासारखी राहिलेली नाही. खूप महागाई वाढलेली आहे मान्य आहे.
परंतु त्यांच्यासाठी केअरटेकर ठेवू शकतात.
वृद्ध व्यक्तींना काही अपेक्षा नसतात. फक्त त्यांना दोन वेळेस चे जेवण आणि थोडेसे बोलणे इतकेच अपेक्षित असते. खूप मागण्या आहेत का त्यांच्या तर नाही.
एका अनाथाश्रमामध्ये त्यांचा मुलगा त्यांच्या वडिलांना सोडवायला आला.
जे अनाथ आश्रम चालवतात त्या संस्थापिकेला म्हणाला मी आता परत कधी भेटायला येऊ माझ्या वडिलांना. तर त्यांनी खूप छान उत्तर दिले की परत येऊ नका. तर मुलाने विचारले हे तर माझेच वडील आहे आणि तुम्ही का म्हणतात की येऊ नका.
तर त्या संस्थापिकेने खूप छान उत्तर दिले की तुमचे वडील आहेत हे जर तुमचे असते तर तुम्ही वृद्धाश्रमा मध्ये आणून सोडले नसते.
खरोखरच उत्तरामध्ये खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
एका लेखांमध्ये मी वाचले आहे की तिथे त्यांना बळजबरी हसावे लागते. आणि समोरच्यांनी सांगितले त्याप्रमाणे वागावे सुद्धा लागते. म्हणजे या गोष्टी मनाविरुद्ध झाल्या की नाही.
थोडक्यात डोंबाऱ्याच्या खेळाप्रमाणे यांना नाचवले जाते.
त्या व्यक्तींची म्हणणे आहे की आम्ही आता वृद्ध झालेला आहोत आम्हाला कोणत्याही अपेक्षा नाही तर त्यामध्ये आम्हाला नाचवले देखील जाते. हे कितपत योग्य आहे.
मी म्हणत नाही प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये ही परिस्थिती असेल. पण थोड्याफार फरकाने ही परिस्थिती आहे.
बरं आता हा वृद्धाश्रमामध्ये आहे त्या व्यक्तींचा प्रश्न सुटलेला आहे. कमीत कमी त्यांना दोन वेळेस चे अन्न देखील मिळते तसेच आरोग्याच्या सेवा देखील त्यांना पुरवल्या जातात.
पण तुम्ही हा विचार केला आहे का कधी. की रस्त्यावरचे वृद्ध व्यक्ती आपल्याला फिरताना दिसतात. त्यामध्ये म्हाताऱ्या आजी आणि म्हातारे बाबा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात.
मग ह्या रस्त्यावरच्या लोकांचे काय करायचे हा प्रश्न मला पडतो. तुम्हाला कधी पडतो का?
पोलीस प्रशासन सुद्धा वृद्धाश्रमाचे दार ठोठावतात.
कुठेतरी हे सर्व थांबले पाहिजे असे वाटते.
आपण सुद्धा कधीतरी म्हातारे होणार आहोत वृद्ध होणार आहोत हे आजकालच्या मुलांना ,मुलींना, सुनांना कळत नाही की वळत नाही हेच कळत नाही.
शेवटी जग हे गोल आहे जसे आपण आत्ता वागू त्याचप्रमाणे पुढे जाऊन आपली मुलं आपल्या सोबत वागणार हे निश्चित.
एवढे जरी लक्षात ठेवले आजकालच्या मुला मुलींनी तर बरेचसे जे वृद्धाश्रमात आजी आजोबा आहेत त्यांना आपल्या हक्काच्या घरी नक्की परत घेऊन जाते अशी अपेक्षा वाटते.
त्यांनाही मन आहे त्यांनाही भावना आहेत. एवढे फक्त लक्षात आले की मग बाकीच्या गोष्टी सोप्या होतात असे वाटते.
फक्त वृद्धाश्रमात नेऊन टाकले याने प्रश्न सुटतात का?
त्यांनी मुलांना, मुलीला लहानाचे मोठे केलेले असते. आणि त्यांच्यासाठी खस्ता देखील खाल्लेल्या असतात. हे सर्व आजकालची पिढी विसरते का? याचे विस्मरण का होते हाच मला मोठा प्रश्न पडतो.
काय अडचण होते आई-वडिलांची. हे प्रत्येक मुला मुलींनी स्वतःच्या मनाला एकदा जरूर विचारावे. आपण जे वागतो ते योग्य आहे का एवढाच प्रश्न स्वतःला विचारावा.
जर वृद्धाश्रम नसते तर ह्या मुला मुलींनी आई-वडिलांना बेवारस सोडून दिले असते.
माझे असेही वाचनात आले आहे की आई-वडिलांना यात्रा करून आणतो म्हणून सरळ त्या ठिकाणी सोडून देऊन मुल निघून जातात.
किती वाईट वाटत असेल त्या आई-वडिलांना हा विचार एकदा जरूर करावा सगळ्यांनी.
कुठेतरी थांबा हे सगळे शेवटी असेच म्हणावेसे वाटते.
आपली भारतीय संस्कृती अशी आहे का?
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांना देवा प्रमाणे पुजले जाते. त्यांची सेवा केली जाते. पुण्य मिळवले जाते. ही समज आजकालच्या मुला-मुलींना देणे गरजेचे वाटते.
शेवटी नरेंद्र मोदींनी कायदा तर केलेलाच आहे की जे आई-वडिलांना सांभाळणार नाही त्यांना आपल्या प्रॉपर्टी मधून बेदखल करायचे आहे. शेवटी कितीही कायदे केले तरी मुले पळवाटा काढतात.
त्याचे काय? हा प्रश्न शेवटी राहतोच.
मोठे नवल वाटते आजकालच्या पिढीचे की तुमच्या आई वडील सांभाळा हे तुम्हाला सांगावे लागते. मी म्हणत नाही सगळेच मुलं मुली असे करतात.
पण वृद्धाश्रमामध्ये दिवसेंदिवस वाढणारी संख्या हे निदर्शनास आणून देत आहे की आत्ताच्या पिढीला जन्मदाते आई-वडील देखील जड झालेले आहेत
पुण्यासारख्या ठिकाणी तर आई-वडिलांना डस्टबिन म्हणतात सुना याचेही नवल वाटते मोठे.
आजकालच्या पिढीला संस्कारांची गरज वाटते. तसेच त्यांची कान उघाडणी सुद्धा करण्याची गरज आहे असे वाटते.
कुठेतरी थांबा हे सगळे शेवटी म्हणावेसे वाटते.
श्रुती पवार. जगताप. महाराष्ट्र रत्न.

0 Comments