लातूर :
शास्त्रीय संगीतामध्ये अविरतपणे कार्यरत असलेली आणि भारतभर आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची ख्याती पसरलेली आवर्तन मासिक संगीत सभा, या मासिक संगीत सभेचा ऐतिहासिक असा दशकपूर्ति संगीत समारोह मागील वर्षी दिमाखात संपन्न झाला.
आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शास्त्रीय संगीतामधील गुणवंत युवा तबलावादक कलावंतास लातूर येथील ऋषीतुल्य संगीत प्रचारक प्रसारक व एक आदर्श गुरु म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला आणि ज्यांचा शिष्य परिवार आज साता समुद्रा पार आपल्या कलेची पताका गाजवत आहेत असे गुरुवर्य पंडित शांताराम चिगरी गुरुजी यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पंडित शांताराम चिगरी आवर्तन युवा पुरस्कार यावर्षी मुंबई येथील सुप्रसिद्ध तबलावादक युवा तबलावादक तेजोवृष जोशी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पंडित चिगरी गुरुजींचेच पट्ट शिष्य आणि गुरुजींवर नितांत श्रद्धा असणारे श्री. विशाल जाधव यांच्या संकल्पनेतून व यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो, पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
या अगोदर संभाजीनगर येथील तबलावादक युवा कलावंत जगमित्र लिंगाडे , पुणे येथील तबलावादक युवा कलावंत महेशराज साळुंखे, लातूर येथील युवा तबलावादक श्री तेजस धुमाळ, व आळंदी येथील स्वरीत पांचाळ यांना प्रदान करण्यात आला आहे, आणि यावर्षीचा पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध तबलावादक तेजोवृष जोशी यांना जाहीर झाला आहे , या पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये रोख व मानपत्र असे आहे,
यावर्षीचा पुरस्कार ज्यांना जाहीर झाला आहे ते मुळातच संगीतातील समृद्ध कुटुंबाचा वारसा लाभलेले तेजोवृष जोशी यांना आई-वडिलांकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे मिळाले, पुढे ज्येष्ठ सुप्रसिद्ध तबलावादक पंडित बापूसाहेब पटवर्धन यांच्याकडून फारुकाबाद घराण्याची तालीम तेजावृष जोशी यांना मिळाली आहे .
रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी सायंकाळी
6 : 00 वाजता अष्टविनायक मंदिर गणेश हॉल येथे होणाऱ्या 124 व्या मासिक संगीत सभेमध्ये तेजावृष जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व यांचे तबला सोलो वादन आयोजित केले आहे यांना लहरा साथ संगत लातूर येथील प्रसिद्ध युवा संवादिनी वादक श्री चैतन्य पांचाळ हे करणार आहेत ,
तरी आपण सर्व रसिकांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी व संगीत सभेसाठी यावे असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
या युवा कलावंताचे आवर्तन चे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉक्टर रविराज पोरे, कार्यक्रम नियोजन समिती प्रमुख विशाल जाधव, डॉक्टर संदीप जगदाळे हरीसर्वोत्तम जोशी,कोषाध्यक्ष केशव जोशी, डॉक्टर वृषाली देशमुख , डॉक्टर मंजुषा कुलकर्णी , शंभूदेव केंद्रे, विवेक डोंगरे, सुनील टाक ,सतीश मिरखलकर, शरद होळकर , तसेच आवर्तन परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. व सदरील मासिक संगीत सभेसाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments