निवडणुकांचे राजकारण.
महापालिकेचा प्रचार हा आता बंद झाला आहे परंतु त्यांचा स्वतःचा प्रसार मात्र सुरूच आहे. तो कसा तर छुप्या मार्गाने तो चालूच आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. तेरी भी चुप और मेरी बीच अशा पद्धतीने छुपा प्रचार हा चालू आहे.
त्याची चर्चा न केलेलीच बरी. सध्या भाव मात्र बराच वधारला आहे.
पोलीस आणि प्रशासन यांच्या नाकाखालूनच प्रचार हा होत आहे. कोणीच कोणाला घाबरत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक ठिकाणी आमिष दाखवले जात आहे. मटन पार्ट्या, दारूची पार्ट्या, रोख पैसा अशा स्वरूपामध्ये वाटले जात आहे. आता मतदार कशाला बोलतील हे मात्र सांगणे अवघड आहे.
पक्षांतर तर लोक हे सहजतेने करत आहे. एक पक्ष सोडला की दुसरा पक्ष. पक्ष बदलणे अगदी सोपे झाले आहे. जसा विचार बदलावा तसे पक्ष ही बदलतो आहे.
त्यामुळे मतदारांना अजूनच संभ्रम निर्माण झाला आहे की मतदान द्यावे कोणाला. एकतर पक्ष बदलला की निष्ठाही बदलते. त्यामुळे अजूनच कठीण प्रश्न निर्माण होतो.
वाहत्या वाऱ्याबरोबर आपणही वाहवे का असा प्रश्न मतदारांना पडलेला दिसतो.
बरं सगळ्यांनाच जनतेचे कल्याण करायचे आहे विकास करायचा आहे असे हे निवडणूक ला उभे राहणारे सांगतात. हे ही खरे मानले तरी एकाच पक्षात राहतील याची शाश्वती हे लोक देतील का? विकास करतील का? का फक्त निवडणूक लढवण्यापुरते आणि निवडून आणण्यापुरते आश्वासन देतात हे काही मात्र सांगता येत नाही.
नाशिक मध्ये जे कोणते पक्ष उभे आहेत ते प्राणपणाने लढत आहेत. त्यामुळे मतदारांनी काय समजायचे. हाही मोठा प्रश्न आहे.
कार्यकर्त्यांमध्ये भांडण राडे झालेले आहेत ही काही गोष्ट नवीन नाशिककरांसाठी.
आता पुढे काय होईल हे काही सांगता येत नाही कोणता पक्ष उजवा ठरतो आणि कोणता डावा हे आता निवडणुकीनंतरच आपल्याला समजेल.
तरी निवडणुकीसाठी सर्व
पक्षातल्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. आणि निवडणुकीनंतर कबूल केलेले मुद्दे किंवा मागण्या या पूर्ण कराव्या एवढीच इच्छा.
निवडणुकीच्या आधी एकमेकांची झालेल्या गोष्टी काढू नये. कुरापती काढू नये. तर खरा मार्ग हा प्रगतीचा आणि वेगाने विकास करण्याचा असावा इतकेच.
श्रुती पवार. महाराष्ट्र रत्न.

0 Comments