अंबाजोगाई न.प.प्रभाग आरक्षणात इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी तर अनेकांना बदलावे लागणार स्वतःचे हक्काचे वार्ड


---------------------------------------------------------------------------

उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे,मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व सय्यद अन्वरभाई यांच्या प्रभावी नियोजनामुळे जिल्ह्यात सर्वात आधी विनातक्रार काढण्यात आली सोडत प्रक्रिया
----------------------------------------------------------------------------
अंबाजोगाई नगर परिषदेच्या 15 प्रभागातील 31 नगरसेवकांच्या निवडीसाठीची आरक्षण प्रक्रिया आज बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या स्व.विलासराव देशमुख सभागृहात सकाळी 11 वाजता पार पडली. उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात आली. दोन लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण काढण्यात आले. जाहीर झालेल्या आरक्षणात अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते त्या ठिकाणी परिश्रम घेत होते तसेचे कोरोना काळामध्ये मोठी मेहनत घेत अनेकांना मदत आणि सहकार्य केले होते. मात्र ते प्रभाग आरक्षित झाल्याने इतर प्रभागाकडे त्यांना मोर्चा वळवावा लागणार आहे. मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे व निवडणूक विभागाचे सय्यद अन्वर यांनी अतिशय उत्तमरित्या नियोजन केले होते तर उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे व तहसीलदार विलास तरंगे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूचनानुसार आरक्षण प्रक्रिया राबवली. बीड जिल्ह्यात सर्वप्रथम कमी वेळेत ही प्रक्रिया राबवण्यात आल्याने जिल्हाभरातून मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांचे कौतुक केले.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात नगर परिषदेच्या 15 प्रभागासाठी व 31 नगरसेवक निवडीसाठी वार्ड आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आली. प्रारंभी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 5 जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी 3 जागा महिला व 2 सर्वसाधारणसाठी राखीव करण्यात आल्या. नंतर ओबीसी प्रवर्गासाठी एकूण 8 जागा आरक्षित करण्यात आल्या त्यापैकी 4 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. शेवटच्या टप्प्यात सर्वसाधारणसाठी सोडत काढण्यात आली एकूण 18 सर्वसाधारण मधून 9 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. एकूण 31 जागांपैकी 16 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे व न.प.निवडणूक विभाग प्रमुख सय्यद अन्वर यांनी समाज माध्यमातून असेल,वर्तमानपत्रातून असेल किंवा जी जी माध्यमे शहरातील मतदारांपर्यंत पोहोचतील यासाठी जाहीर आवाहन केले होते. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आरक्षण सोडतीसाठी जवळपास 200 च्या आसपास इच्छुक उमेदवार, नागरिक व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. उत्कृष्ट नियोजनामुळे ही प्रक्रिया जवळपास तासभरात पार पडली. जिल्ह्यात कमी वेळेत म्हणजे जलद गतीने आणि विना तक्रार ही प्रक्रिया पार पडली. प्रारंभी लावण्या बिभिषण कोकाटे व सोनाली सतीश पारवे या लहान मुलींच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आणि कायद्यातील कलमे काय सांगतात याकडे वजाळे यांनी लक्ष वेधून घेतले. त्यांना तहसीलदार विलास तरंगे व मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी सहकार्य केले.
जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेकांची कोंडी झाली आहे. कारण गेल्या 5 वर्षापासून ते आपापल्या वार्डात लढण्याची तयारी करीत होते मात्र ते वार्ड महिलांना आरक्षित झाल्याने त्या ठिकाणी कुटुंबातील महिलांना निवडणूक लढवावी लागणार आहे.
वार्ड क्रमांक 3 मधून माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी हे ओबीसी प्रवर्गातून येतात तो वार्ड सर्वसाधारण साठी झाला आहे या ठिकाणाहून ते लढणार का असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र त्याचे खंडन करत सारंग पुजारी यांनी सांगितले की हा माझा व माझ्या कुटुंबीयांवर प्रेम करणारा वार्ड आहे माझ्या वडिलांपासून ते माझ्यापर्यंत या वार्डाणे व वार्डातील मतदारांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळे जनता जनार्दनाच्या आशीर्वाद इथूनच आपण लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा असल्याचा आत्मविश्वास सारंग पुजारी यांनी व्यक्त केला आहे.
वार्ड क्रमांक 4 मधून युवा नेते भीमसेन आप्पा लोमटे यांनी जोरदार तयारी गेल्या पाच वर्षापासून केली होती मात्र हा वार्ड महिला सर्वसाधारणसाठी राखीव झाला आहे. येथून त्यांच्या पत्नी निवडणूक लढवतील असे भीमसेन आप्पा लोमटे यांनी जाहीर केले आहे.
दिनेश भराडीया हे वार्ड क्रमांक 15 मधून निवडणूक लढवत होते तो वार्ड आता अस्ताव्यस्त पसरला आहे त्यासोबतच आगामी राजकीय स्थिती व स्थित्यंतरे आणि बदल पाहता त्यांनी 15 मधून थेट वार्ड क्रमांक 9 मधून निश्चित केले आहे. आणि तेथूनच ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संतोष शिनगारे यांचा पूर्वीचा वार्ड क्रमांक 12 होता तो एससी सर्वसाधारणसाठी होता तो पुन्हा एससी सर्वसाधारणसाठी झाल्याने शिंगारे यांनी समाधान व्यक्त केले असून मुंदडा कुटुंबीय हाच माझा पक्ष असून तो जो आदेश देतील तो आदेश पाळून आपण काम करणार असल्याचे शिनगारे यांनी सांगितले.
वार्ड क्रमांक 6 हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला असून त्या ठिकाणाहून अनेक जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने अजित दिलीपराव सांगळे, सुरेश कराड, आकाश कराड यांचे राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी अंतिम मानली जाते.यांची नावे पटलावर आहेत त्या ठिकाणी चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे परंतु भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी देतो याकडे लक्ष लागले आहे.
⚫ परमेश्वर गित्ते अंबाजोगाई

Post a Comment

0 Comments