समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चर्चाकार सेल प्रदेशाध्यक्षपदी निवड
समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश चर्चाकार सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ॲड. शिवाजी देवाजी कांबळे यांची निवड झाल्याने संपूर्ण राज्यातील समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, पक्षाच्या संघटनात्मक कार्यात नवा उत्साह निर्माण झाला आहे.
ॲड. शंकर चव्हाण (अधिवक्ता, बॉम्बे हायकोर्ट) यांनी या निमित्ताने शुभेच्छा देताना म्हटलं की, “ॲड. शिवाजी कांबळे हे समाजवादी विचारसरणीचे प्रगल्भ, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या वेदना जाणणारे आणि अन्यायाविरोधात नेहमीच उभे राहणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात चर्चाकार सेलला नवचैतन्य मिळेल आणि पक्षाच्या विचारांची मुळे अधिक घट्ट रुजतील.”
ॲड. कांबळे यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या वक्तृत्वातून आणि संघटन कौशल्यातून युवक वर्गात जागरूकता आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले असून, त्यांची ही निवड म्हणजे कार्यकर्त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.
या नियुक्तीनंतर समाजवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सालेहा शेख, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शेख जिन्नाल, राजेश परदेशी, राजेंद्र परदेशी, आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना ॲड. कांबळे म्हणाले, “माझ्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास हा जबाबदारीचा दाय आहे. महाराष्ट्रात समाजवादी विचारांचा झंझावात निर्माण करून सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारित राजकारण घडवणे हेच माझं उद्दिष्ट आहे. समाजातील वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी लढा देणं ही माझी प्राथमिकता राहील.”
ॲड. शंकर चव्हाण यांनीही यावेळी असे मत व्यक्त केले की, “समाजवादी विचारसरणी ही फक्त राजकीय विचार नाही, तर ती समाजाला दिशा देणारी जीवनशैली आहे. आजच्या असमानतेच्या काळात शिवाजी कांबळेसारख्या नेत्यांची आवश्यकता आहे, जे फक्त बोलत नाहीत तर कृतीतून समाज बदलतात.”
या निवडीमुळे समाजवादी पक्षाच्या चर्चाकार सेलच्या कार्यात नवसंजीवनी येणार असून, राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश आणि प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
– ॲड. शंकर चव्हाण, अधिवक्ता, बॉम्बे हायकोर्ट
📧 adv.shankarchavan@gmail.com
📞 9769759737


0 Comments