जागतिक कन्या दिन

जागतिक कन्या दिन हा नुकताच 28 सप्टेंबरला होऊन गेला त्यानिमित्ताने थोडेसे मनोगत. 

पहिली बेटी धनाची पेटी हे तर आपण वाक्य ऐकतोच. 

पूर्वी आई-वडिलांना मुली ह्या ओझे वाटत असे. लहान याच्या मोठ्या करताना नाकात दम येत असे. 

मोठी झाल्यानंतर तिचे लग्न आणि सासर कसे मिळेल यातच त्यांचे आयुष्य जात असे. 

लग्नासाठी पैसा खर्च करणे ,तो जमवणे त्यावेळी अत्यंत अवघड होते. 

लहानाचे मोठे करताना तिच्यावर खूप संस्कार केले जात असे. ती कशी राहते कशी वाटते याकडे आई-वडिलांची बारकाईने लक्ष असायचे. मुली ह्या कधी ओझे वाटले नाही आई-वडिलांना. 

सासरी गेल्यावर आपली मुलगी व्यवस्थित राहील ना ही चिंता आई-वडिलांना नेहमी सतावत असते.

किती ही झाले तरी आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याला देणे सोपे नाही. 

कारण लहानपणापासूनच तिच्या हट्ट पुरवणे. 

तिच्या मागण्या मान्य करणे. लाडाने सांभाळणे. माया करणे, जीव लावणे या साऱ्या गोष्टी होत असे. 

आजकाल तर मुले आणि मुली यामध्ये भेद राहिलेला नाही. 

पूर्वी तरी शिक्षणासाठी मुलींना झगडावे लागत होते.

परंतु आता मुलींना भरपूर शिक्षण देणे त्यांच्या पायावर उभे करणे याकडे पालकांचे जास्त लक्ष असते. 

प्रत्येकाला देवाने एक मुलगी द्यावी. 

ज्यांना मुली नाही ते पालक मुलींसाठी तरसतात. मुलींना खूप माया असते. आई-वडिलांची काळजी त्या घेतात. माया लावतात. 

पूर्वी वंशाला दिवा पाहिजे म्हणून कितीतरी आपत्य होऊन देत असे. 

परंतु आता तसे नाही एक जरी मुलगी झाली तरी पालकांना खूप आनंद होतो. वंशाला दिवा पाहिजेच असा हट्ट आता पालक करत नाही. कारण मुली सुद्धा या मुलांप्रमाणेच आई-वडिलांकडे लक्ष देतात त्यांची काळजी घेतात. 

आता मुली भरपूर शिकतात. कोणी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पायलट, वकील, जज अशा कितीतरी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग दिसतो. 

काळानुसार मुली भरपूर पुढे शिक्षणाच्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत.

पूर्वी लग्न जमवताना आई-वडिलांना खूप अडचणी येत असे. मुलगी झाली तर आई-वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असे. 

पण आता तसे नाही मुलगी जन्माला आली तर तिचे खूप ठिकाणी आनंदाने स्वागत केले जाते. 

घर सजवून तिच्या आईला देखील मानसन्मानाने घरामध्ये आणले जाते. तिला लक्ष्मीची स्वरूप मानले जाते. मुलगी झाली लक्ष्मी आली  असे म्हटले जाते.

मुली भरपूर शिकतात आपल्या पायावर उभे राहतात आणि लग्न करताना सुद्धा आपल्या शिक्षणाानुसार वर निवडतात. सर्वस्वी लग्नाचा निर्णय त्यांचा असतो. 

त्यांच्यासारखे शिकलेले स्थळ असेल तरच त्या हो म्हणतात.

काळानुसार पालकांचे देखील मत आता बदलत चाललेले आहे. 

वंशाला दिवा हा मुलगाच असतो हा समज आता चुकीचा ठरवला जात आहे. 

मुलगी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे हे पालकांना हळूहळू कळू लागले आहे. 

म्हणून प्रत्येक घरामध्ये एक तरी मुलगी पाहिजे. 

ज्या घरामध्ये मुलगी असते त्या घराला घरपण असते. 

माया सुद्धा असते. 


श्रुती पवार. महाराष्ट्र रत्न.

Post a Comment

0 Comments