देशाचा सैनिक होणे सोपे नाही. सैनिक आपले आयुष्य पूर्ण देशासाठी समर्पण करत असतात. त्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो. फक्त देशसेवा आणि देशसेवेसाठी वेडे झालेले सैनिक. एवढीच त्यांची ओळख असते.
सैनिक होताना सगळे घरदार आणि आपले सगळे नातेवाईक घरातले सर्व मंडळी सोडून त्यांना यावे लागते.
युद्ध सुरू होते त्यावेळेस त्या सैनिकांची मनाची अवस्था काय होते हे त्यांच्या जागेवर ठेवून आपण बघितले तर कळते. आज आपण सुरक्षित केवळ सैनिकांमुळेच आहोत. व जे आरामात राहतो स्वतंत्ररित्या राहतो ते केवळ सैनिकांमुळेच.
सैनिक देशाचे संरक्षण करतात रात्रंदिवस जागे राहतात भरपूर हाल अपेष्टा सहन करतात. पण कधी कुरबुर करत नाही. आणि आपण सर्व सगळे असून सुद्धा कुरबुरी करत राहतो.
मला त्या आईंचेही कौतुक करा असे वाटते की आपली पोटची मुलं देशसेवेसाठी समर्पण करतात.
सोपे नाही हे किती काळजावर दगड ठेवून आई आपल्या मुलांना पाठवत असते.
जेव्हा युद्ध सुरू होते तेव्हा आपली मुले घरी परत येतील की नाही हे सुद्धा त्यांना माहीत नसते.
आणि देश सेवा करता करता जेव्हा देशासाठी शहीद होतात तेव्हा त्यांच्या घरच्यांना किती वाईट वाटत असेल हे वेगळे सांगायला नको.
ए मेरे वतन के लोगो
जरा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए है उनकी
जरा याद करो कुर्बानी.
खरोखरच देशातले लोक सैनिकांना तात्पुरते लक्षात ठेवतात नंतर मात्र त्यांनी देशासाठीकेलेले कार्य विसरतात. असे व्हायला नको सैनिकांचे प्रचंड उपकार आपल्या देशातल्या लोकांवर आहेत.
सैनिकांचे सुद्धा तेवढेच प्रेम आहे रात्रंदिवस ते देशासाठी आणि आपल्यासाठी लढत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. प्रत्येकाला आपला जीव किती प्यारा असतो हे कोणी सांगायला नको.
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्ता हमारा
ये बुलबुले इसकी
ये गुलिस्ता हमारा. सारे जहाँ से अच्छा.
खरोखरच आपला देश इतर देशांपेक्षा खूप चांगला आहे.
जहा डाल डाल पर
सोने की चिडिया
करती है बसेरा
वह भारत देश है मेरा.
खरोखरच आपले भाग्य आहे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो.
आणि आपले अहोभाग्य की असे सैनिक आपल्याला लाभलेले आहेत की जे फक्त रात्रंदिवस देशाचा विचार करतात.
शेवटी जाता जाता भारत माता की जय. कितीही लिहिले सैनिकांविषयी तरी ते कमीच आहेत शब्द कमी पडतात असे वाटते.
सैनिकांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील.
श्रुती पवार. महाराष्ट्र रत्न 25


0 Comments