डॉ. तपसे यांचे मनोगत :
"माझी ही निवड माझ्यावर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे हक्क, सन्मान आणि न्याय मिळवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. लीगल सेलच्या माध्यमातून न्यायप्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी कटिबद्ध आहे. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संघटनेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच माझे प्रमुख ध्येय राहील."
नागपूर :
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या (मॅग्मो) लीगल सेलच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. तपसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
मॅग्मो ही शासनमान्य संघटना असून, ती सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हक्क आणि हितासाठी कार्यरत आहे. डॉ. तपसे यांच्या निवडीमुळे लीगल सेलला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीचे पत्र संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. कन्नमवार सर, राज्य सरचिटणीस डॉ. संतोष हिंडोळे सर, राज्य मुख्य समन्वयक डॉ. निलेश टापरे सर, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार सर आणि प्रमुख मार्गदर्शक डॉ. राजेश गायकवाड सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
डॉ. तपसे यांच्याबद्दल :
डॉ. दत्ता तपसे हे अनुभवी, न्यायप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकुशलतेचा लाभ अनेकांना झाला आहे. त्यांनी वैद्यकीय प्रशासन, कायदेविषयक बाबी आणि जनतेच्या आरोग्यहक्कासाठी सातत्याने भरीव कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मॅग्मो लीगल सेल अधिक सक्षम, सक्रिय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी न्याय मिळवणारी शक्ती बनेल, असा विश्वास संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अभिनंदनपर संदेश :
या निवडीबद्दल केंद्र सरकारचे सल्लागार सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी डॉ. दत्ता तपसे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या नेतृत्वात लीगल सेलची कार्यक्षमता अधिक वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला.
डॉ. तपसे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

0 Comments