"घोटाळेबाज आणि भ्रष्ट मंत्र्यांकडून उद्घाटनं करू नका" – ॲड. शंकर चव्हाण यांचे महाराष्ट्र दिनी एक महत्त्वपूर्ण ट्विट
मुंबई –
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून मुंबई उच्च
नायालयाचे विधिज्ञ ॲड. शंकर चव्हाण यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट करत सध्याच्या
राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर आपली परखड भूमिका मांडली आहे. "घोटाळेबाज आणि
भ्रष्ट मंत्र्यांकडून उद्घाटनं करू नका," असा सल्ला देत त्यांनी युवा
पिढीला एक वेगळा संदेश दिला आहे.
ॲड. शंकर
चव्हाण म्हणाले की, "कोणताही नवीन व्यवसाय, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक संस्था किंवा इतर कोणतीही सकारात्मक सुरुवात करत असाल, तर त्या उपक्रमाचे उद्घाटन आपल्या आई-वडिलांच्या हस्ते करा किंवा आपल्या
जीवनात ज्यांनी मार्गदर्शन केलं, अशा गुरुजनांच्या किंवा आपण
श्रद्धेने मानणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते करा." त्यांनी असा मुद्दा मांडला की,
"सत्ताधारी मंत्री, खासदार किंवा आमदार
हे कायमचे कोणाचेही नसतात. सत्ता असताना ते जवळचे वाटतात, पण
बहुतेक वेळा त्यांचे हात भ्रष्टाचारात माखलेले असतात."
ॲड. शंकर
चव्हाण यांनी पुढे सांगितले की, "आज जे मंत्री किंवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यापैकी अनेकांचे हात दोन नंबरच्या धंद्यातून कमावलेल्या पैशाने
माखलेले आहेत. त्यांच्या हस्ते जर एखाद्या चांगल्या कामाचा शुभारंभ झाला, तर त्या सकारात्मक प्रयत्नालाच गालबोट लागू शकतो."
तरुणांना आवाहन – "नव्या विचारांनी राजकारणात
या"
या
संदेशात त्यांनी महाराष्ट्रातील तरुण वर्गालाही उद्देशून महत्त्वाचा सल्ला दिला.
ते म्हणाले, "महाराष्ट्राचा खरा बदल हवा असेल, तर अभ्यासू,
कष्टकरी, आणि समाजहिताच्या विचारांनी प्रेरित
असलेल्या युवकांनी राजकारणात यावं. जुना घाणेरडा खेळ बाजूला सारून नव्या पिढीने
नेतृत्व घ्यायला हवं."
ते पुढे
म्हणाले, "आजच्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. गुन्हेगारीला आळा
बसला पाहिजे. प्रशासन आणि पोलिसांवर लोकांचा विश्वास बसायला हवा आणि
सर्वसामान्यांना न्याय मिळणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे."
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत थेट भूमिका
महाराष्ट्र
दिन म्हणजे राज्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि नव्या दिशा ठरवण्याचा दिवस आहे. याच
दिवशी ॲड. शंकर चव्हाण यांनी हा संदेश देत आजच्या राजकीय नेतृत्वाच्या ढोंगी
वागणुकीवर थेट प्रहार केला. त्यांनी इशाराही दिला की, “आपण ज्या
व्यक्तीकडून उद्घाटन करून घेतो, ती व्यक्ती लोकहितासाठी किती
पारदर्शक आहे, हे पाहिल्याशिवाय उद्घाटन करू नका. कारण
सुरुवात पवित्र असेल, तर पुढचा प्रवास यशस्वी होतो.”
समाज माध्यमांतून मोठा प्रतिसाद
ॲड. शंकर
चव्हाण यांच्या ट्विटला समाजमाध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या
मताशी सहमती दर्शवली असून, काहींनी आपल्या जीवनातील अनुभव शेअर करून "हेच खरं नेतृत्व" अशी
प्रतिक्रिया दिली आहे. विशेषतः युवक, उद्योजक आणि सामाजिक
कार्यकर्ते या ट्विटवर आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
बदल हवा तर मानसिकता बदला
या
संपूर्ण वक्तव्यातून ॲड. शंकर चव्हाण यांनी एक मोलाचा संदेश दिला आहे – कोणताही
उपक्रम सुरू करताना सकारात्मक उर्जेच्या लोकांचा सहवास घ्या. जे आपल्या कार्यातून
समाजाला घडवत आहेत, त्यांच्या हस्तेच आपला प्रवास सुरू करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
भ्रष्ट आणि ढोंगी राजकारण्यांना देवासारखं मानणं थांबवा – ही वेळ
नव्या महाराष्ट्राची सुरुवात करण्याची आहे.



0 Comments