चहा आणि आरोग्य - नुकताच 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन होऊन गेला. त्याविषयी थोडेसे


भारतासारख्या देशामध्ये चहा हा सगळ्यांनाच आवडतो. ते एक केवळ पेय नसून सगळ्यांचा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. 

सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना चहा लागतो. तरच दिवस आपला चांगला जातो. भारतातल्या लोकांना चहा हा लागतोच. चहा नाही पीत असे बोटावर मोजणे इतपतच लोक आहे. इतकी सवय चहाची सगळ्यांना झालेली आहे.  परंतु चहा हा आरोग्यासाठी चांगला आहे की वाईट. 
सम्राट याने चहाचा शोध लावला.  झाडाची पाने चुकून पाण्यामध्ये पडली आणि त्या पाण्याला चांगला कलर आला आणि वास सुद्धा आला ते पाणी पिऊन पाहिले तर अतिशय सुगंधी छान लागले म्हणून चहाचा शोध लागला असे मानले जाते.  ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये चहा लोकप्रिय केला. आसाम आणि निलगिरी टेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चहाच्या बागा लावण्यात आलेल्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भारतीयांना चहाची सवय लागली.  विशेष करून रेल्वे स्थानक ऑफिस कष्टकऱ्यांमध्ये चहाची संकल्पना इतकी रुजली किती आजपर्यंत तशीच आहे. कष्ट करून दमले की ताकद देण्यासाठी चहा हा मात्र घेतला जातो सगळीकडे. तल्लफ भागवण्यासाठी बरेच लोक चहा पीत असतात.
भारतामध्ये ब्लॅक टी, भरपूर दूध घालून चहा, वेलदोडा, आले, गवती चहा, चहाचा मसाला, भरपूर साखर, तसेच गूळ असा फक्कड चहा केला जातो. घरी पाहुणे आले तर पहिला आग्रह हा चहा जात असतो.  अगत्याने त्यांना आपल्या घरी बोलवणे आणि चहा देणे ही आपली भारतीय परंपराच आहे.  ग्लासभर चहा, तर कधी कटिंग असा चहा आपल्याकडे असतो.

चहा मध्य अँटिऑक्सिडन्स असतात. पेशींचे संरक्षण करतात आणि म्हातार पण लवकर येत नाही.  हृदयासाठी सुद्धा फायदेशीर , तणाव कमी होतो, पचनासाठी उपयुक्त.  चहा मधले झोपेमुळे आलेली सुस्ती घालवते. खूप चहा घेणे आरोग्यास घातक असते. कॅफिन चा अतिरेक टाळावा. 
साखरेचा अतिरेक पण वाईट.  मधुमेह लठ्ठपणा जास्त चहाने येऊ शकतो. त्याऐवजी ग्रीन टी हरबल टी किंवा ब्लॅक टी यांचा समावेश करावा. 
जेवणानंतर लगेच चहा लागतो तोही वाईट ही सवय सोडावी. दिवसातून दोन-तीन वेळेस चहा घेणे योग्य आहे. चहा योग्य प्रमाणात घेतला तर
आरोग्यास पूरक ठरतो. जास्त घेतल्यास हानिकारक ठरू शकतो. असा हा चहा सगळ्यांनाच आवडतो.  
- श्रुती पवार

Post a Comment

0 Comments