उन्हाळा जसा वाढत आहे तस तसा सगळ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण सगळ्यांनी वाढवायचे आहे. तसेच पाणी असलेले फळे उदाहरणार्थ कलिंगड, संत्री, मोसंबी, ही फळे खायची आहे. तसेच फ्रिज मधले पाणी बाहेर न आल्यावर ताबडतोब यायचे नाही. थंडगार माठातले पाणी प्यावे. शक्यतो फ्रीजमध्ये नको. आणि पाच दहा मिनिटं बसून आपले शरीर उष्ण असते त्यामुळे पाच दहा मिनिटांनी मगच शांत बसून पाणी प्यावे. तसेच ताक, दही , लस्सी, हेही तुम्ही घेऊ शकता. तसेच तुळशीचे बी , सब्जा हे भिजवून तुम्ही पाण्यात किंवा दुधात घेऊ शकता. तसेच अंघोळ करताना शक्यतो थंड पाणी वापरले तरी चालते. ज्यांना थंड पाणी सहन होत नाही त्यांनी कोमट पाणी घ्यावे. तसेच जेवणामध्ये जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये. साधे वरण भात भाजी पोळी याचे जेवण करावे. तसेच कोशिंबीर रोजच जेवणामध्ये ठेवावी. दह्याचे प्रमाण वाढवावे. रात्री धने भिजून सकाळी अनारशेपोटी जर घेतले तर उष्णतेचा त्रास हा कमी होईल. तसेच जिऱ्याचा वापरही वाढवावा. रात्री जिरे भिजवून तेही पाणी पिले तरी चालते. पोटामध्ये थंडावा येतो. अशी काळजी उन्हाळ्यात जर घेतली तर. उष्णतेचा त्रास हा कोणालाच होणार नाही. सतत घेता जाता पाणी पिणे खूप उत्तम.
- श्रुती पवार. 7020260192

0 Comments