मुंबई: मुंबई उच्च न्यायालयातील नामांकित विधिज्ञ ॲड. रवी जाधव यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विश्वनाथ फौंडेशनच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. ॲड. रवी जाधव हे बॉम्बे सिटी सिव्हिल अँड कोर्ट बार असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष असून त्यांनी न्यायव्यवस्थेत दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या संघर्षमय वाटचालीमुळे त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
ॲड. रवी
जाधव यांचा प्रवास हा कष्ट व जिद्दीने परिपूर्ण आहे. त्यांनी उच्च न्यायालय आणि
सर्वोच्च न्यायालयात अनेक कठीण प्रकरणांमध्ये यश मिळवले आहे. त्यांचे क्रिमिनल आणि
सिव्हिल प्रकरणांवरील प्रभुत्व उल्लेखनीय आहे. त्यांनी हाताळलेले अनेक प्रकरणे हे
त्यांच्या तर्कशुद्ध युक्तिवादामुळे यशस्वी ठरले आहेत. विधी क्षेत्रात नवोदित
वकिलांसाठी ते एक आदर्श ठरले आहेत. लहानपणापासूनच कायद्याबाबत असलेली आवड आणि जिज्ञासा
यामुळे ते या क्षेत्राकडे वळले. त्यांच्या यशामागे त्यांची मेहनत आणि चिकाटी यांचे
महत्त्व आहे. त्यांच्या मते, कोणत्याही
कार्यात प्रामाणिकपणा आणि समर्पण हवे.
विधी
क्षेत्रासोबतच ॲड. रवी जाधव यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही मोलाचे योगदान
दिले आहे. अनेक समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. गरजूंना मोफत
कायदेशीर सल्ला देऊन त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. समाजासाठी काहीतरी
करण्याची त्यांची उर्मी आजही तशीच आहे. राजकीय, सामाजिक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, उद्घाटक आणि व्याख्याते म्हणून
त्यांची ख्याती आहे.
मुंबईसारख्या
मोठ्या शहरात स्थिरस्थावर होणे ही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, ॲड. जाधव यांनी कठीण प्रसंगांचा सामना करून यश
मिळवले. त्यांच्या मेहनतीमुळे आज ते एक विश्वासार्ह विधिज्ञ म्हणून ओळखले जातात.
देशातील अनेक न्यायालयात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांच्या यशामुळे
तरुण वकिलांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
विश्वनाथ
फौंडेशनच्या वतीने ॲड. रवी जाधव यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
फौंडेशनचे सचिव ॲड. शंकर चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या
प्रसंगी क्रांती ग्राम आश्रम शाळेचे संस्थापक सुरेश यादव, उद्योजक माने आणि ॲड. श्वेता त्रिपाठी उपस्थित होते.
या गौरव सोहळ्याला अनेक नामवंत विधिज्ञ, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
अव्याहत
व्यस्तता असूनही ॲड. रवी जाधव यांना वाचनाचा छंद आहे. त्यांचा स्वभाव मितभाषी
असूनही समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी त्यांना कायम प्रेरित करते.
त्यांच्यासोबत काम करणारे सहकारीही त्यांच्याबद्दल नेहमीच कौतुकाने बोलतात.
त्यांची जीवनशैली आणि समर्पण तरुणांना प्रेरणा देते.
ॲड. जाधव
यांचा प्रवास संघर्षाचा आणि यशाचा उत्तम उदाहरण आहे. त्यांनी मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर मिळवलेले यश
आजच्या पिढीतील वकिलांसाठी एक मार्गदर्शक ठरते. त्यांची तळमळ आणि सत्यासाठी
झगडण्याची वृत्ती ही नवोदित वकिलांना प्रेरित करते. त्यांच्या मते, यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो; कठोर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्नच यशस्वी करतात.
विधी
क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा संकल्प भविष्यातही असाच कायम
राहील. समाजासाठी आणि न्यायव्यवस्थेसाठी त्यांनी केलेले योगदान हे पुढील
पिढ्यांसाठीही आदर्श ठरेल. विश्वनाथ फौंडेशनच्या वतीने त्यांना दिला गेलेला हा
सन्मान त्यांच्या कार्याची पावती असून भविष्यातही ते न्यायव्यवस्थेत महत्त्वाची
भूमिका बजावतील, याबद्दल कोणतीही शंका नाही.


0 Comments