कोंढवा भागातील वाहतूक बाबत रमजान महिन्यात नागरिकांना दिलासा



झाकिर पठाण | पुणे प्रतिनिधी : 

कात्रज,कोंढवा उंड्री,पिसोळी, वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे या भागाने मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील गर्दीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक असलेल्या कोंढवा विभागत वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे या मार्गावरील कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढला आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर  चौक सुधारणा, अर्धवर्तुळाकार वळण, उजवीकडे वळणात पोलिसांनी बदल केले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. त्यामुळे रमजान महिन्यात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पुढाकारातून पी पीआय विनय पाटणकर, पीआय कुमार गाडगे वाहतूक विभाग, संतोष खाडे, हेमंत फटींग, नदाफ राजपूत पवार, दाभेकर  गोरे मॅडम यांच्या प्रयत्नातून  परिसरातील वाहतूक कोंडी निवळली आहे.परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते, छबिल पटेल, झाकिर पठाण, कमरूद्दिन शेख, व येथील लोकप्रतिनिधी यांनी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच योग्य त्या उपाययोजना वाहतूक शाखेकडून करण्याबाबत सूचना देखील केल्या. त्यानुसार वाहतूक विभागाने या रस्त्यावरील समस्यांचा अभ्यास केला. महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे काम करीत उपाययोजना केल्या. अनेक ठिकाणी उजवीकडील वळणामुळे मुख्य रस्त्यावर कोंडी होत होती. त्यामुळे ही सुविधा बंद करून पुढे अर्धवर्तुळाकार वळण दिल्याने मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली.  या उपाययोजनांनंतर  वाहतुकीची वर्दळ पाहून करण्यात आलेल्या विश्लेषणाद्वारे संबंधित भागातील वेग वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनामुळे या मार्गावरील कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढला आहे. यामुळे कोंडवातील नागरिकांना कमालीचा दिलासा मिळाला आहे.


Post a Comment

0 Comments