मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी घोषणा फसवी – ॲड. शंकर चव्हाण यांचा घणाघात
» पुणे | प्रतिनिधी :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या दिमाखात सातबारा कोरा करण्याची आणि कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, आजवर या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही, असे सांगत ॲड. शंकर चव्हाण यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून फडणवीस सरकारला धारेवर धरले असून, खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे.
ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याचे स्वप्न दाखवले. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती फक्त लाल गाजर दिले गेले. कर्जमाफीचा लाभ कुठेच दिसत नाही. आश्वासनांची पेरणी करून सरकारने फक्त राजकीय लाभ मिळवला, पण प्रत्यक्ष कृती काहीच दिसत नाही.”
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले असताना, राज्य सरकार फक्त घोषणा आणि आश्वासनांवरच भर देत आहे, अशी टीका ॲड. शंकर चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे स्वप्न अद्याप अधुरेच राहिले असून सरकारच्या फसव्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, असेही त्यांनी म्हटले.
राज्यात शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, फडणवीस सरकारकडून दिलेले आश्वासन अद्याप हवेतच विरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
कर्जमाफीबरोबरच ॲड. शंकर चव्हाण यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवरही सरकारला जाब विचारला आहे. “मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असूनही महाराष्ट्रात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले असून, गुन्हेगारी रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
याशिवाय, – जातपातीचे राजकारण करून सामान्य जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले जात आहेत," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले.
राज्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचार, लूटमार, खून, अपहरण यासारख्या घटनांमध्ये वाढ होत असताना सरकार शांत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, जातीपातीच्या राजकारणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. कर्जमाफी न करता समाजात फूट पाडणारे राजकारण केले जात आहे, असे सांगत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या वादावर आता सरकार काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जनतेच्या भावना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे सरकार गांभीर्याने लक्ष देईल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनता सरकारकडून अपेक्षा ठेवून बसलेली आहे, मात्र सरकारने केवळ घोषणा आणि मोठमोठ्या आश्वासनांपुरतेच मर्यादित राहून जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही, हेच सरकारच्या अपयशाचे ठळक उदाहरण आहे, असे ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या ट्विटद्वारे स्पष्ट केले.
राजकीय वर्तुळात – ॲड. शंकर चव्हाण यांच्या या टीकेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात सरकार यावर काय प्रतिक्रिया देते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या परिस्थितीत राज्यातील अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून फक्त घोषणांचा खेळ चालवत आहे. "सरकारने त्वरित कर्जमाफीची अंमलबजावणी करावी अन्यथा शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागेल," अशी आक्रमक भूमिका ॲड. शंकर चव्हाण यांनी घेतली आहे.


0 Comments