राजमाता जिजाऊ.



राजमाता जिजाऊ. 

येत्या रविवारी 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. 

रयतेची काळजी घेणाऱ्या एक उत्तम प्रशासक होत्या. 

शहाजीराजांच्या सखी आणि शिवरायांच्या सल्लागार असणाऱ्या जिजाऊ. जिजाऊंचे जीवन कार्य समता , स्वातंत्र्य, न्याय, सहिष्णुता सामाजिक सलोखा म्हणून आदर्श होते. 

आजही त्यांची विचार दीपस्तंबासारखे मार्गदर्शन करणारे आहे. 

पेज प्रसंगातून तलवारीपेक्षा बुद्धिमत्तेचा वापर करून त्यातनं बाहेर कसे पडायचे हे जिजाऊ साहेबांनी फक्त शिवरायांवरच नाही तर मावळ्यांवर सुद्धा विचार रुजवले. 

शिवरायांवरच नाहीतर मावळ्यांवर सुद्धा पुत्रवत प्रेम करणाऱ्या जिजाऊ. 

लोकभाषा , लोककला, लोक संस्कृती ग्रंथ काव्य निर्मिती यांना प्रोत्साहन देणाऱ्या जिजाऊ. 

जात, धर्म, लिंग वंश भाषा यांच्या पलीकडे जाऊन समतावादी मूल्यांची रुजवन करून लोककल्याणकारी स्वराज्याचा पाया घालणाऱ्या जिजाऊ. शिवराय संभाजी महाराज येसूबाई ,ताराराणी यांचीच नाही तर महाराष्ट्रातील आधुनिक विचारवंतांची प्रेरक ठरलेल्या जिजाऊ. 

जिजामाता यांचा जन्म 12 इसवी सन 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. राजमाता जिजाऊ या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. 

स्वराज्य ज्यांनी घडवला 

घडविला विधाता 

धन्य त्या स्वराज्य जननी 

थोर जिजाऊ माता. 

ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे. सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे.

अशी शिकवण त्यांनी दिली कार्य प्रवण करणाऱ्या योजक जिजाऊंनी माणसाला आणि समाजाला आकार दिला. आर्थिक परिस्थिती समजून घेऊन तिला आकार देण्याची सर्जनक्षमता त्यांच्याकडे होती. 

त्या दुसऱ्याला कार्यप्रवण करणाऱ्या योजक होत्या. 

त्यांनी सहकार्याची प्रवृत्ती या गुणाचा विकास केला. जी स्थिती आहे ती तशीच राहावी किंवा आलेल्या परिस्थितीला शरण जावे अशी धारणा त्यांची कधीही नव्हती. 

निजामशाहीच्या ऱ्हासानंतर शहाजीराजे आणि जिजाऊंच्या संकटांचे डोंगर उभे राहिले. बुद्ध जिजाऊंनी मुघलांना कैद केले होते. तेव्हा दुष्काळ पडलेला होता आणि मानवी जीवन प्रचंड खडतर झालेले होते. अशा संकटातही न डगमगताया खंबीरपणे उभ्या राहिल्या.

जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीशी तसेच उच्च तत्वांसाठी आणि नीती मूल्यांसाठी सातत्याने संघर्ष करत राहिल्या ही गोष्ट आजच्या काळातील महिलांना प्रेरणा देणारी ठरते. 

जिजाऊंच्या जीवनातील अशा अनेक घटना व्यक्त झाल्या ज्याचे आजचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत 

पारतंत्र्यात जगतो तो माणूस नाही तो स्वतःच्या मर्जीने जगतो तोच खरा हे जिजाऊंचे विचार अत्यंत महत्त्वाचे वाटतात.

श्रुती पवार,_जगताप. 

मोबाईल नंबर7020260192


Post a Comment

0 Comments