लातूर येथील बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक 17/ 12/2024 या दिवशी बोटॅनिकल गार्डनचे उद्घाटन प्रमुख पाहुणे बसवेश्वर महाविद्यालयातील तसेच बोटॅनिकल विभागतज्ञ डॉक्टर दीपक भगवानराव चाटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे प्राचार्य अनिल पॉल सर, उपप्राचार्य अजय शर्मा सर, शाळेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर ,ऍडव्होकेट सचिन सुळ सर, सीए दिगंबर साके सर सीए संभाजी सरडे सर व्यवस्थापक वैजनाथ कदम सर तसेच शाळेतील इयत्ता पाचवी व आठवी,विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते
या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक भगवानराव चाटे यांनी विद्यार्थ्यांना बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय व त्याचे फायदे काय याबद्दल माहिती दिली वैज्ञानिक संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी बहुविध वनस्पतींची लागवड त्यांचा संग्रह तसेच नाव वर्णनासहित प्रदर्शन
उद्यानामध्ये केलेले असते त्याला बोटॅनिकल गार्डन म्हणजेच वनस्पती उद्यान असे म्हटले जाते .
बिर्ला शाळेतील बोटॅनिकल गार्डनमध्ये मेथी ,पालक ,टमाटे ,दोडके ,भेंडी, तसेच गुलाब व चाफा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे या वनस्पतींची नावे व त्यांची माहिती दर्शवण्यासाठी उद्यानामध्ये काही फलके लावण्यात आली आहेत या अशा विविध फलकांच्या वाचनामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची माहिती समजते.


0 Comments