अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घातल्याचे सर्वत्र दिसते कारण विज्ञान व अध्यात्म यांच्याव्दारे विश्वातील ज्ञान होऊ शकते विज्ञान विश्लेषण तर अध्यात्म संश्लेषण करते असे मत जळगांव येथील प्रा.डॉ.अश्विन झाला यांनी व्यक्त केले
योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव व्याख्यानमालेत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक एल.जी.वैद्य होते.
पुढे बोलताना प्रा.झाला म्हणाले की,
विज्ञान सांगते की मानवाच्या मनात साठ हजार विचार येतात पण या विचारांपैकी किती विचारांचा संकल्प होतो ही ज्याची त्याची धारणा आहे
मानवी शरीर आहे तो पर्यंतच अध्यात्म आणि विज्ञान राहणारच आहे विज्ञान बाहय प्रमाणाने तर अध्यात्म आंतरिक प्रतीतीने शोध घेते विज्ञानाने अनेक गोष्टी सिद्ध केल्यात तर बऱ्याच गोष्टी सिद्ध नाहीत असा एक समज आहे पण सर्वच जण त्या नियंत्रणासाठी प्रयत्नशिल असतात त्याचा त्या त्या वेळी परिणामही दिसतो असेही प्रा.झाला म्हणाले पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य पी.आर. थारकर यांनी केले प्रास्तविक व संचालन प्रा.रमेश सोनवळकर यांनी केले.
यावेळी संस्था पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.


0 Comments