श्रीकृष्ण गोविंद देवकीनंदन मोहन गोपाल श्याम घनश्याम हरी बाकी बिहारी गिरधारी इतके नावे श्रीकृष्णाला आहेत. 108 नावे श्रीकृष्णाला आहेत त्यातले लोकप्रिय हे आहेत.
कृष्ण म्हटल्यानंतर परमेश्वराचे सावळे तेजस्वी मनोहारी डोळ्यात साठवण्यासारखे रूप अत्यंत सुंदर मोहक असे रूप प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते.
श्रीकृष्णाच्या जन्मा विषयी माहिती सगळ्यांनाच आहे तरी संक्षिप्त स्वरूपात पाहू. श्रीकृष्ण यादव कुळातील होते श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे अष्टमीला हा जन्मदिवस सगळीकडे धामधूम पद्धतीने साजरा केला जातो. मोठ्या भक्ती भावाने व उत्साहात साजरा होतो.
कृष्णा अंधारात जन्माला याचा प्रवास जरी गूढ असला तरी शिकवण ही गुढ च आहे. ती नीट पाहू कृष्णाला समजून घ्यायचं असेल तर सावध चित्त असायला हवे.
खोडकर केव्हा नटखट पणा करे ल आधार काढून पळून जाईल भरोसा नाही.
मथुरेचा राजा कंस यांच्याकडे कृष्णाची आई देवकी व वासुदेव हे कैदेत होते देवकीचा पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी व वासुदेवांना कैदेत ठेवले होते पहिली सात अपत्ये जन्मताक्षणीच ठार केली आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वासुदेवांनी त्याला आपला गोकुळातील मित्र नंद यांच्या स्वाधीन केले.
निवासस्थान द्वारका गुजरात मध्ये आहे शस्त्र सुदर्शन श्रीकृष्णाकडे आहे श्रीकृष्णाला राधा रुक्मिणी सत्यभामा जामवंती भद्रा मित्र विंदा लक्ष्मणा सत्यभामा सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या शिवाय नरकासुराच्या कैदेतील 16000 100 स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.
राधेचे कृष्णावर खूप प्रेम होते गर्गसंहिता नमूद करतात की कृष्णाने वृंदावन जवळील भांडीवन जंगलात ब्रह्माच्या उपस्थित गुप्तपणे राधाशी लग्न केले होते.
कृष्णाला मोरपीस व बासरी अत्यंत प्रिय आहे फुलांमध्ये पारिजातकाचे फुल आवडते होते तुळशीची माळ प्राण्यांमध्ये घोडा कृष्णाकडे पांढरे शुभ्र घोडे होते. कृष्ण हा उत्तम रथाचा सारथी होता
कृष्णाकडे मुरली होती ही मुरली पितानंद यांनी दिलेली होती.
अभिमन्यू चक्रव्यूहात फसला कशामुळे तर श्रीकृष्णामुळेच चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं पण त्यातून बाहेर कसं पडायचं ते सांगितलं नाही.
कृष्णा असाच अजब आहे आपल्याला फसवतो गंमत बघतो स्मितहास्य देतो रस्ता थोडासा दाखवतो पण मार्ग आपल्यालाच शोधावा लागतो.
फसल्यानंतर त्याच्याकडे अपेक्षाने पाहत बसाल तर फक्त सौम्य असतो फार गहन अर्थ आहे हसण्यामागे जे करायचे आहे स्वतःच्या बळावर करा शिकून घ्या समजून घ्या आत्मसात करा असे त्या हास्यामागे अर्थ आहे.
महाभारतामध्ये पांडवका जिंकले तर प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडून होता आणि वेळोवेळी श्रीकृष्णाचे मार्गदर्शन पांडवांना मिळाले कौरवांकडे एवढी सेना असूनही ते हारले प्रत्यक्षात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य श्रीकृष्णाने केले.
एवढा देव असूनही श्रीकृष्णाला भोग जे वाट्याला आले ते जन्माला आले तेव्हापासून मृत्यूपर्यंत टाळता आलेले नाही तर आपण खूप सामान्य माणसे आहोत देवांना सुद्धा भोग टाळता आलेले नाही.
श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांधिपनी ऋषी ंकडे गुरुग्रही राहून शिक्षण घेतले. कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्यू समये वय 108 वर्षे होते हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते.
श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखे बरेच आहे त्यातील काही ओळी पाहू
1 कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करत राहणे.
2 भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास सेवापूजन.
3 प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो. कर्तव्य पालनासाठी मी श्रीकृष्णाचे अभंग ऐकायची तेव्हा झाडलोट करी जनी , केरभरी चक्रपाणी हा अभंग ऐकला की वाटायचे काय भाग्यवंत होत्या संत जनाबाई खुद्द श्रीकृष्ण केर भरायला येतो. मोठे झाल्यावर कळले की श्रीकृष्ण केवळ कचरा भरायला येत नाही तर सातत्याने आयुष्यातला कचरा स्वच्छ करत राहतो. साऱ्या नकारात्मक गोष्टी दूर ठेवतो.
कृष्णाबद्दलचे एक बोबड गीत ऐकण्यात आले , दायबा कितना आता ये तला तुझ्या तंग मी ये नाल नाय.,
आपण कृष्णावर रागावू देखील शकतो हा विश्वास देणारा गीत मला खूप भावले. श्रीकृष्ण सारखा सखा कुठेही सापडत नाही सुदामा आणि कृष्णाची मैत्री चे दाखले आजही आपण देतो. मैत्री ही केवळ श्रीमंती पाहून केली जात नाही. हे श्रीकृष्णाने आपल्याला वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.
- श्रुती पवार नाशिक


0 Comments