आपली पहिली भेट
नेमकी सांगणे अशक्य
कारण...
स्मृतीच्या आणि नेणिवेच्या
पलिकडच्या
गोष्टी सांगता येत नाहीत
पण काळाच्या त्या मितीतून
या मितीत येत असताना
पहिली भेट
तुझीच झाली असेल कदाचित
तेव्हापासून तू
माझ्या अस्तित्वात
खोल खोल गेलास...
मुरत गेलास...
अगदी मनात
आता माझे प्रेम
जिथवर म्हणून आहे...
तिथे सर्वदूर तू आहेसच
झाडांची मुळे
पसरावीत तशी...
म्हणजे माझं प्रेम
तुझ्यासाठी आहेच असं नाही
पण तुझ्यामुळेच आहे
हे नक्की
अगदी परवा परवाच
आमच्या फांदीवरील
..
किंवा अगदी पहिल्यांदा किंवा शेवटच्या
लिहिलेल्या, वाचलेल्या प्रेमपत्रातही...
किंवा अगदी स्मशानातही आता शेवट पर्यंत माझं प्रेम तुच असेल...
असो
लिहिता लिहिता राहिल
हे तुझ्यापासून कसं लपवू?)
या संकटातून पुढे
नेमकं काय उगवेल
सांगणेही अश्यक्यच...
पण काळाच्या
या मिठीत असेपर्यंत तरी
माझे अस्तित्व तुझ्यापासून
वेगळे करणेही अशक्यच.. 🥀
✍️भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच
अहमदनगर जिल्हा कोषाध्यक्ष..❤️🥀
प्राजक्ता राजेंद्र बोकेफोडे.. 🥀

0 Comments