लातूर येथील बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त आज दिनांक 16/7/2024 ला दिंडी काढली होती या माध्यमातून वारकरी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्व विशद केले यावेळी शाळेतील प्राचार्य अनिल पॉल सर, शाळेतील उपप्राचार्य अजय शर्मा सर, आणि शाळेचे व्यवस्थापक वैजनाथ कदम सर यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करून भक्तीमय भावाने दिंडीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर चिमुकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तिमय केला होता. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे. शाळेतील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अक्षय बारस्कर सर आणि त्यांच्या सहकारी वर्गाने आपापल्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शाळेतील शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले


0 Comments