क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाचा निकाल ९६.५५ %

 क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाचा निकाल ९६.५५ %

येल्डा.ता.अंबाजोगाई येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाचा विक्रमी ९६.५५ टक्के निकाल लागला असून या विद्यालयातील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव माननीय श्री.राजपाल भगवानरावजी लोमटे,

सौ.रूपाली राजपाल लोमटे,

मा.श्री.सतीश भगवानराव लोमटे, तसेच परिसरातील पालक व गावकरी यांनीही अभिनंदन केले.तसेच मा.मुख्याध्यापक श्री.विवेक वामनराव गंगणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही परिसरातील पालक,गावकरी कौतुक करत आहेत.

    विद्यालयातून विशेष प्रावीण्यासह १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर प्रथम श्रेणीत २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.आणि द्वितीय श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

   गुणानुक्रमे विद्यालयातून सर्वप्रथम- चि.शिंदे अतिश महादेव (८९.५९%)

द्वितीय-चि.शिंदे ज्ञानेश्वर लिंबाजी (८४.६०%)

तृतीय-चि.चामनर वैभव परमेश्वर (८३.४०%)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी विद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.




Post a Comment

0 Comments