संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ठाकुर्ली पारितोषिक वितरण समारंभ




डोंबिवली ( विद्या कुलकर्णी ) - संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ठाकुर्ली जिल्हा नैतिक मूल्यशिक्षण योजनेचा पारितोषिक समारंभ शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी टिळक नगर विद्यामंदिर डोंबिवली येथे मोठ्या थाटात पार पडला. ही संस्था गेली वीस वर्षे नैतिक शिक्षणाचे कार्य करीत असून ठाकुर्ली जिल्ह्यातील २० शाळांमधील जवळजवळ ३३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातील एकूण १,३०,००० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता चौथीला गोष्टीरूप रामायण, पाचवी संत कथा, सहावीसाठी चरित्र रामायण, सातवीला महाभारत व आठवीसाठी क्रांती गाथा अशी अभ्यासक्रमाची पुस्तके असून त्यावर युट्युब ला व्हिडिओ सुद्धा इंग्रजी, मराठी, हिंदी व गुजराती या चार भाषांमध्ये आहेत. त्यावर साधारणतः जानेवारी महिन्यात परीक्षा घेतली जाते. यंदा १७ जानेवारी २०२४ ला झालेल्या या परीक्षेत ठाकुरली प्रखंडातील २० शाळांमधील ४३ विद्यार्थी हे सुवर्णपदक प्राप्त विजेते ठरले असून उर्वरित सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात मंजुनाथ विद्यालयाच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या एकदंताय वक्रतुण्डाय धीमहि या गाण्याने झाली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ऐगिरी नंदिनी हे दुर्गा स्तोत्र कथक नृत्य सादर केले. तर टिळक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बीज अंकुरे हे समूह नृत्य सादर केले, तर लावण्या पाटील हिने एकपात्री प्रयोग सादर केला व सुवर्णाताई पटवर्धन यांच्या 'मेरे झोपडी मे राम आयेंगे' या गाण्याने मनोरंजक व कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रमुख अतिथी श्री माधवजी जोशी अध्यक्ष लक्ष्मीनारायण ट्रस्ट यांनी संस्काराचे महत्त्व आजच्या जीवनात किती आवश्यक आहे हे विशद केले तर दुसरे अतिथी टिळक नगर शि.प्र. मंडळाचे सचिव श्री आशीर्वाद जी बोंद्रे यांनी सध्याची शिक्षण पद्धती व येऊ घातलेली शिक्षण पद्धती यावर विचार मांडले. कोकण प्रांत संयोजिका सौ अस्मिताताई आपटे यांनी प्रतिष्ठान राबवीत असलेल्या व भावी उपक्रमांबाबतची माहिती उपस्थितांना दिली, व शिक्षक पालक यांचा सहभाग कसा करता येईल हे सांगितले. समारंभाचे प्रास्ताविक, विभाग संयोजक श्री गौरव कुलकर्णी यांनी केले. संस्था परिचय प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री सदानंद खामकर यांनी दिला.यावेळी 18 शिक्षक पाच मुख्याध्यापक 65 विद्यार्थी व 25 पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यात मीराताई कुलकर्णी प्रांत कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ नागरिक संघ श्री विलास काळे, कीर्तनकार वर्षाताई काळे, प्रवचनकार रंजनाताई चव्हाण, श्री जांदे, श्री माधव डोंगरे, रा. स्व. संघाचे शशिकांत गाणार, सौ चिंचणकर, रंजना चौहान , माजी नगरसेविका शिल्पा शेलार, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी टिळक नगर विद्यालयाच्या श्री नामदेव चौधरी सर व त्यांच्या चमूचे खूपच सहकार्य लाभले.सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंत्रोच्चारात व ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करून पदके देण्यात आली. सर्व मान्यवरांचा, मुख्याध्यापक शिक्षकांचा गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. श्री किशोर हुन्नरगीकर यांनी पेढ्याचा प्रसाद आणला होता. त्याचे वाटप केले, तर मनोरंजन कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना पेन व बिस्किटे देण्यात आली.या दिमाखदार सोहळ्याचे नियोजन ठाकुरली प्रखंडाचे अध्यक्ष श्री सुभाषजी देशपांडे व संयोजिका सौ वृषाली जांदे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक थत्ते यांनी व परिचय श्री अशोक जी पाठक यांनी तर परीक्षा विभाग श्री अविनाश जोशी यांनी सांभाळला. मुलांना आशीर्वचन श्री. खाडिलकर गुरुजींनी दिले तर आभार प्रखंड संयोजिका वृषालीताई जांदे यांनी मानले. सौ वर्षा ताई काळे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments