क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयात गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

 


येल्डा,ता.अंबाजोगाई येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयात  विविध स्पर्धांचा गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.गंगणे विवेक वामनराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून येल्डा गावचे प्रथम नागरिक सरपंच मा.श्रीमती राजुबाई भानुदास कर्णर व संस्थेचे माजी विद्यार्थी मा.श्री.अमोल ज्ञानोबाराव मुंडे(वनपरिक्षेत्र अधिकारी) तसेच मा.सौ.पल्लवी सुंदरराव गित्ते(माजी सरपंच नंदागौळ)यांची प्रमुख उपस्थिती होती.  सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.विद्यालयातील विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. सर्व पाहुण्यांचा सन्मान शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.विवेक गंगणे सरांनी शाल,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन केला.  कार्यक्रमाच्या सुरूवातीस शाळेचे माजी विद्यार्थी तथा शिक्षक मा.श्री. सचिन कर्णर  सरांनी क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाची गौरवगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली.व या परिसरातील ऊसतोड कामगारांची व्यथा मांडून कठोर परिश्रमांशिवाय पर्याय नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. प्रमुख पाहुणे मा.श्री.अमोल मुंडे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र देताना कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी किमान दहा हजार तास अभ्यास करावा लागेल,तरचं यश साध्य होईल असे समजावून सांगितले. मा.सौ.पल्लवी गित्ते मॅडम यांनी स्पर्धेच्या गतीमान युगात केवळ शालेय पाठ्यपुस्तके वाचून यशस्वी होता येणार नाही तर इतर शास्त्रज्ञ,विचारवंत व समाजसुधारकांचे वाचन होणे गरजेचे आहे.मुख्याध्यापक मा.श्री.गंगणे सरांचे हे दोन्ही प्रमुख पाहुणे विद्यार्थी असल्याने त्यांनी सरांच्या काळातील विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगताना सरांनी त्यांना कसे स्टेज मिळवून दिले.यावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. अध्यक्षीय भाषणात मा.मुख्याध्यापक गंगणे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक युगात लाजुन चालणार नाही तर परिस्थितीला सामोरे जाऊन यश खेचून आणावे लागेल. तरचं आई-वडिलांचे स्वप्न तुम्ही साकारू शकाल. शेवटी विद्यार्थ्यांसाठी उत्सुकता वाढवणारा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मा.श्री.प्रकाश मेढे सरांनी मानले.या कार्यक्रमास विद्यार्थी,पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे कर्मचारी श्री.जोशी ए.एन.,श्री.वाघ एन.डी.,श्री.मेढे पी.एस.,श्री.देशपांडे पी.ए.,श्री. सुर्यवंशी पी.व्ही.,श्री.मोरे एन एम.,श्री.क्षीरसागर जे.पी.,श्री.जोगदंड आर.एम.,श्री.भालेकर एस.एस.,श्री.जाधव ए.सी. व श्री.मोरे बी.बी.यांनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments