या जगण्यावर शतदा प्रेम करावे....
आयुष्य खूप सुंदर आहे .अगदी ये वाक्य वाचायला खूप छान वाटते परंतु इतका मोठा अर्थ या वाक्याचा दडलेला आहे की दोन शब्दात सांगणे शकय नाही तर एक पुस्तक तयार होईल इतका मोठा आहे. कारण जीवन जगत असताना अनेक संकटाना सामोरे जावे लागतं तर अनेक प्रवास करावे लागतात मग त्यात सुखाचे आले आणि काही दुःखाचे .
मानवी जीवन म्हंटल की थाट ,माट आला.हौस ,मौज ,मज्जा ,मस्ती ,समाज आला.अर्ध जीवन हे अन्न, वस्त ,निवारा यातच जात.मानवी जीवन हे फक्त आयुष्य जगत मात्र कमी कमावण्याच्या धडपडीत जातं. त्यात संसार आला.
जीवन जगण्याचा तीन टप्पे आहेत.त्यात 1 बाल्य अवस्था 2 तरुण अवस्था आणि 3 वृद्ध अवस्था .
1बाल्य अवस्था
इतकं मस्त आयुष्य जगतात लहान मुलं की त्यांच्या डोक्याला कसलाच ताण नसतो. फक्त खेळणं ,बागडत ,खान ,पीन आणि झोपणं यातच त्यांचा दिवस जातो.मनाला वाटेल तस वागणं लाड आणि फक्त लाडच असतो.सगळे लहान असल्यामुळे त्याना कोणी रागावत नाही ना मार देत नाही.
2 तरुण अवस्था
हे वय मात्र काहीतरी आयुष्यात नाव करून दाखवायचं असत ,अभ्यास करून आपलं स्वप्नं सत्यात साकार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याच असतं.आपलं नाव हे कमवण्याचं हेच वय असतं .एकदा ही संधी हातातून गेली की पूर्ण आयुष्य भर प्रयत्न करून काही फायदा होत नाही.स्वतः च्या पायावर उभा टाकण्याचं भविष्यात संसार उभा करण्याच हेच वय असतं.
3 वृद्ध अवस्था
या वयाची तुलना ही बाल वयासोबत केली जाते. या वयात मात्र वृद्ध माणस हे लहान मुलासारखी वागायला लागतात.
आलेलं आयुष्य याच धावपळीत निघून जात.म्हणून माणसाने आहे त्यात समाधान माना आणि आयुषय जगुन घ्या.कोण जाणे पुढचा जन्म मानवी मिळणार आहे की नाही.सुख हे कुठंच शोधून मिळतं नाही दुःख हे मागून कधी मिळतं नाही.आलेला प्रत्येक दिवस चांगली सुरुवात करतो आणि नवीन काहितरी घेऊन येत असतो.म्हणून प्रत्येक दिवसच स्वागत करा .
निराशावादी राहू नका .आयुष्य जगत असताना अनेक संकटे येतात काही कामाला यश येत राहतं तर काहींना अपयश येत.अपयश मात्र पचवता आलं पाहिजे.परंतु प्रयत्न मात्र सोडू नका.न खचत खंबीर राहून जो प्रामाणिकपणे जो काम करतो त्यांना यश नक्कीच मिळतं असतं.
स्वलिखित -डॉ सुजाता फड मुंडे
बी ए एम एस

0 Comments