आमदार नितेश राणे यांची दौंड पोलीस स्टेशन वर धडक, गुन्हेगारांना अटक न झाल्यास पोलिसांना 48 तासांचा अल्टिमेट....



आमदार नितेश राणे यांची दौंड पोलीस स्टेशन वर धडक, गुन्हेगारांना अटक न झाल्यास पोलिसांना 48 तासांचा अल्टिमेट....

दौंड प्रतिनिधी -  दौंड मध्ये हिंदू-भगिनींच्या झालेल्या छेडछाडीच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलना मध्ये आमदार नितेश राणे सामील होते. दौंड पोलीस स्टेशन वरती धडक मोर्चा मध्ये  राणे सामील झाले होते. यामध्ये गुन्हेगारांकडून होत असलेले गैरवर्तनांना आळा घालण्याचे पोलीस प्रशासनाला नितेश राणे यांनी आव्हान केले आहे. जर कोणी यापुढे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील व हिंदू भगिनींकडे आणि भावांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचे डोळे नीट ठेवणार नाही असा सज्जड इशारा  आमदार राणे यांनी दिला आहे.

48 तासात आरोपींना अटक करण्याचा नितेश राणे यांनी पोलिसांना अल्टिमेट दिला आहे, आरोपींना अटक झाली नाही तर 48 तासानंतर आणखीन वेगळ्या  येथील  ब्रेकिंग सुरू होतील असे  राणे यांनी पत्रकार यांना बोलताना संबोधित केले आहे. यावेळी हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात हिंदू बंधू-भगिनी उपस्थित होत्या... असे शंभर बादशहा पाहिले आहेत आणि संपविले आहेत असेही राणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत नमुद केले. यापुढे दौंड मधील प्रत्येक घटनेवरती नितेश राणे लक्ष ठेवून असेल व आगामी काळात विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल. व यापुढेही हिंदू भगिनींच्या पुढे नितेश राणे हजर असेल असे यावेळी  राणे यांनी सांगितले... पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता...

Post a Comment

0 Comments