बिर्ला स्कूलचा 'जागर स्वच्छतेचा'
लातूर: बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूल, लातूर येथील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून रेणापूर येथे स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियाना अंतर्गत शाळेच्या प्राचार्यांसोबत, शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींनी रेणापूर येथील श्री रेणुका देवी मंदिर व मंदिर परिसर येथे स्वच्छता अभियान राबविले. या स्वच्छता अभियाना अंतर्गत सर्वांनी मंदिर व मंदीर परिसरातील पूर्ण स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी सर्व कचरा गोळा करून, त्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून घंटागाडीत सुपूर्द केला. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छता जागृती बाबत बाजारपेठेतून रॅली काढली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी 'जागर स्वच्छतेचा' हे उदबोधनपर पथनाट्य ही सादर केले. शाळेकडून घेतलेल्या या उपक्रमास मंदिर प्रशासन व गावातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन त्यांचे आभार मानले.



0 Comments