जिथं अपेक्षा करतो ...?
जिथं अपेक्षा करतो
तिथं च काही तरी चुकतंय
योग्य वेळ आली की
बरोबर कळतंय
ज्यांना आपलंस केलं
त्यांनीच योग्य वेळ
आल्यास दूर केलंय
कोणास ठाऊक
असं माझ्यासोबत
का घडतंय
जिथं अपेक्षा करतो
तिथं च काही तरी चुकतंय
जेव्हा सगळं काही समजतंय
तेव्हा मात्र मन कुठेतरी पळत.
अनेक विचारांनी मात्र
गोंधळून जातंय
उगाचच अनेक वळण घेतंय
जिथं अपेक्षा करतो तिथं च
काहीतरी चुकतंय..!
डॉ सुजाता फड
BAMS

0 Comments