येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालया मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार,दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले आहे.
स्व.नाना पालकर स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने संपन्न होणार असून जर कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर सदर स्पर्धा ही ऑनलाईन घ्यावयाची की,कसे या बाबतचा निर्णय हा संयोजन समितीचा असेल चालू शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हे खोलेश्वर महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे.म्हणून या वर्षीच्या या स्पर्धेला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. खोलेश्वर महाविद्यालय मागील ५० वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात विविध सामाजिक,शैक्षणिक गुणवत्तेच्या वाढीसाठी सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.या स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक तथा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत -
१) उजळूनी आज दावू स्वातंत्र्य भारताचे,
२) कोविड-१९ नंतरच्या शिक्षणाची कथा व व्यथा,
३) मुकी होत चाललेली घरे,
४) पर्यावरण रक्षा, जीवन सुरक्षा असे आहेत.
राष्ट्रप्रेम,पर्यावरण,समाज व शिक्षण या चतु:सूत्री ला अनुसरून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.आपला विषय मांडण्यासाठी प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्यांस ७ मिनिटांचा अवधी असणार आहे. स्पर्धेचे माध्यम मराठी असेल, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.तर या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयांनी आपल्या वरीष्ठ महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचा संघ स्पर्धेसाठी पाठवावा.सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.स्पर्धेचे सांघिक शुल्क शंभर रूपये असेल,सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संघाची नोंदणी दिनांक ५ जानेवारी २०२२ पूर्वी महाविद्यालयात करणे गरजेचे आहे.महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना संलग्न असलेली वरिष्ठ महाविद्यालये,कनिष्ठ महाविद्यालये तसेच माध्यमिक विद्यालयांना जोडून असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल.
स्पर्धा शुक्रवार,दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.प्रत्येक संघातील स्पर्धकांच्या गुणांची बेरीज करून संघाचे एकूण गुण मोजले जातील व अधिक गुण मिळविणाऱ्या संघाला स्मृती चषक देण्यात येईल.हा फिरता चषक संबंधित महाविद्यालयाकडे एक वर्षे राहील.स्मृती चषकाची संपूर्ण जबाबदारी ही विजेत्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे राहील.संयोजकांचे पत्र मिळताच चषक सुस्थितीत स्वखर्चाने परत करावा लागेल.स्पर्धेतील भाषणे ही स्मृती चषक किंवा व्यक्तिगत पारितोषिके देण्याच्या पात्रतेची झाली नाहीत असे परीक्षकांचे मत झाल्यास पारितोषिके रहित करण्याचा अधिकार संयोजकांचा राहील.पूर्वनोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या एक वेळ भोजनाची व्यवस्था केली जाईल.कोविड-१९ च्या परिस्थितीनुसार स्पर्धेचे स्वरूप व नियमांमध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार संयोजकास असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेची पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत
प्रथम पारीतोषिक-स्मृतिचिन्ह व रोख रूपये ५००१/- ,
द्वितीय पारीतोषिक-स्मृतिचिन्ह व रोख रूपये ३५०१/- ,
तृतीय पारीतोषिक-स्मृतिचिन्ह व रोख रूपये २५०१/- ,
तसेच प्रत्येकी अकराशे रूपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी स्पर्धाप्रमुख प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर
- संपर्क क्रमांक-९४०५१०२५३२
(मेल आयडी-digambarmudegaonkar@ gmail.com),
स्पर्धा सहप्रमुख प्रा.शाम बारडकर
संपर्क क्रमांक-९४२००१५६५०
(मेल आयडी-baradkar.sham@gmail.com) यांचेकडे करावी.
नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकांवर संपर्क करून प्राप्त करावी.असे आवाहन स्व.नाना पालकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक तथा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

0 Comments