एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नाही का ???

 एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नाही का ???

एस टी कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांच्या पगारात इतका फरक का आढळून येतो.सरकारकडे प्रत्येक प्रशनाचे उत्तर तयार असते मग याच मागणीच का नाही.आम्हाला न्याय हवा आणि मागण्या...! गेली अनेक दिवस एस टि बंद आहे. जवळपास महिना ओलांडून जात आहे.सर्व कर्मचाऱ्यांनी अनेक संप केले तसेच आंदोलने केले.बऱ्याच लोकांनी आक्रोश ,चिंता करून स्वतः ला संपवण्याचा प्रयत्न केला.तसेच अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना हळव्या मनाच्या लोकांचे ह्रदय विकाराने निधन ही झाले. आता यांच्या मागण्या दूर राहिल्या तर अनेकांणी आपले जीवन गमावले ? याला जबाबदार कोण ? फक्त सरकार ....!  इतर सरकारी कर्मचाऱ्यांना  मात्र दिवाळी ला भत्ता मिळतो.अधून मधून अनेक सुट्ट्या काम कमी पगार जास्त.अनेक सुविधा असतात.तसेच लोन मिळते परंतु अशी कोणती चांगली नवीन स्कीम नाही एस टि कर्मचाऱ्यांसाठी.मग 12 ते 15 हजार रु मध्ये महिना भागवायचा कसा?ज्यांची सामान्य परिस्थिती आहे , घरी शेती वगरे काही नाही अश्या लोकांनी महिना भर पैसे घालावे कसे आणि मागे ठेवावे किती . 2 मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अगदी बीकट परिस्थिती झाली आहे काही जणांवर तर कर्जाचा बोजा वाढला आहे. कधी कधी मुलांची शाळेची फिस भरण्यासाठी ही पैसे नसतात तर कधी कोणी आजारी पडलं तर दवाखान्याच बिल भरण ही शक्य नसतं.   सध्या महागाई च्या दुनियेत जगायचं म्हंटल तर पैसे शिवाय  पर्याय नाही.एस टि कर्मचातयासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .आमच्या अटी मान्य करा नाही तर आम्ही हा संप कायम ठेवू.पगर वाढवा तसेच आम्हाला सवलती भत्ता द्या. आम्हाला न्याय पाहिजे.


एस टी कर्मचारी...!

जीवावर बेतून करतो

आम्ही काम

म्हणून आमच्या नशिबी

का कमी दाम

उभा राहून प्रमानिकपणे

गाळतो घाम

म्हणून आमच्याकडे 

मात्र लक्ष द्यायला 

नाही राहत भान

अजूनही अटी मान्य

करण्याचा कोणाचाच

दिसत नाही वाण


   - डॉ सुजाता फड BAMS

Post a Comment

0 Comments