शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सुरेश यादव यांना कोविड योद्धा पुरस्कार
धारूर : एस आर दळवी फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने टीचर ॲप निर्मिती करून या ॲपच्या माध्यमातून covid-19 काळात राज्यभरातील शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या संकल्पनेवर आधारित एक वर्षापासून शिक्षणक्षेत्रातील सर्वांसाठी फाउंडेशन ने खुले व्यासपीठ निर्माण केले गेले होते विधायक कार्य व नवनवीन विचारांचे आदान-प्रदान राबवले गेले यामध्ये आलेल्या नामांकन मधून राज्यातील 11 लोकांची मानांकनासाठी निवड करण्यात आली. सुरेश भगवान यादव अध्यक्ष महात्मा फुले आश्रम शाळा कोळपिंपरी तालुका धारूर जिल्हा बीड यांनी कोरोनाच्या काळात लोकसंसद रेडिओच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रबोधन शैक्षणिक अभ्यासक्रम कोरणा संसर्ग जागृती प्रसारण कार्यक्रम व कोरणा कालावधीमध्ये ऊस तोड मजुरांच्या पाल्यांसाठी सॅनिटायझर,मासचा वापर अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांना घरपोच साहित्य महात्मा फुले आश्रम शाळा येथे विद्यार्थी कर्मचारी पालक यांच्या करिता स्वागत गेटवर सनी टायझर रूम मशीन उभारणी तसेच विधायक कार्य उभारले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दिनांक 13 /11 / 2021 रोजी एस आर दळवी फाउंडेशन यांनी हा महासन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.या वेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सुरेश यादव यांना प्रमाणपत्र ट्रॉफी शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी मा.रणजितसिंह डीसले सर ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते,डॉ. राधाकृष्णा पिल्लई17 पुस्तकांचे बेस्टसेलर लेखक आणि चाणक्य इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक नेतृत्व, मुंबई विद्यापीठ,मा. प्रमोद शिंदे ट्रस्टी - मनशक्ती केन्द लोणावळा,मा.आशिष झलानी अध्यक्ष (आंतरराष्ट्रीय बाजार) - स्क्वेअर पांडा इंक (यूएसए)उपस्थित होते. सुरेश यादव यांचे सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

0 Comments