सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं वागणं ही सध्याच्या काळाची गरज आहे..!

सुंदर दिसण्यापेक्षा  चांगलं वागणं ही सध्याच्या काळाची गरज आहे..!

आयुष्यभर तरुण दिसायला कोणाला आवडणार नाही. यासाठीच तर सगळे धावपळ करतात आणि  मोजमाप न करता पैसे सौंदर्य प्रसाधने घेण्यासाठी आणि पार्लर मध्ये खर्च करतात. काहीच अस म्हणणं आहे की कमी खाल्लं तर चालेल पण पार्लर मध्ये नाही गेलं तर अजिबात नाही चालणार...!  हल्ली सुंदर दिसण्याकडे सगळ्यांचा जास्त कल आहे मग यात तरुण पिढी , वृद्ध आणि जे मध्य अवस्थेत असणारे आले. तरुण मुलं आणि मुली यांचा सर्वात जास्त खर्च हा पार्लर मध्ये होतो.स्त्रियांना सण जवळ येताच तयारी सुरू करतात आणि पार्लर ला तुंबळ सुरू असते.सण म्हटलं की प्रत्येक स्त्री ला नटून थटून छान दिसावं वाटतं असतं. यात स्त्रियांचे सण मकरसंक्रात, वटपौर्णिमा, पंचमी, इत्यादी सण ज्यात स्त्रियांना सजायला आवडते. मग सध्या 21 सावी पिढी असेल तरी  माणूस खूप पुढे प्रगतशील,विचाराने,बुद्धीने, आणि शिक्षण पद्धतीने जात आहे परंतु खंत एक गोष्टीची वाटते आहे की  माणसातली माणुसकी कमी होत चालली आहे आणि चांगलं वागणं हल्ली विसरून जात आहेत." सुंदर विचार आणि चांगली वागणूक हीच  आयुष्यभराची शिदोरी आहे.मग का हो जी शिदोरी आपल्याला  विकत न घेता फक्त आपल्या वागण्यातून मिळू शकते तिथं ही आपण चुकतो  आणि इतरांशी चांगलं वागत नाहीत. विचारांमध्ये बदल घडून आला की  नक्कीच वागणुकी मध्ये बदल घडून घेतो आणि कुठेतरी  व्यक्तीला जाणीव व्हायला लागते की माणसाला माणुसकी ची गरज आहे.संकट काळी,  अडचणीला पैसे असूनही फायदा नाही तर माणूस कामाला येतो.आपण काय सुंदर दिसण्यासाठी जेवढा खर्च करतो तेवढा खर्च कधीतरी गरजूंना करून बघा.त्यांना ती मिळालेली मदत ही त्यांच्या चेहऱ्यावर खूप काही सांगून जाते .तो त्यांचा आनंद हा शब्दात न व्यक्त करता येणारा असतो. आणि त्यांचा भावना  आंनद अश्रुत व्यक्त होतात.म्हणून प्रत्येकाने आपला वायफळ होणारा खर्च गरजूंना नक्की मदत म्हणून करावा.त्यानीं दिलेला आशीर्वाद आणि शुभेच्छा या आपल्याला आयुष्यात चांगल्या कामासाठी मदत करतील.

"का रे तू इतका एकटा 

नाही गरज तुला 

माणसांची ना 

माणुसकीची

नको करू इतका 

अट्टाहास पुन्हा 

करूनही नाही 

फायदा त्या 

पाश्चातापाचा.....!


 म्हणून सुंदर दिसत महत्वाचं नाही तर चांगलं वागणं कधीही महत्वाचं.कोण काळ दिसतं ,तर कोण गोर यावरून  आपण स्वभाव  किंवा कोण किती गरीब मोठं नाही ठरवायचं. कधीही दिसण्यापेक्षा वागणं कसं यावर व्यक्तीचा स्वभाव ठरवला जातो. सध्याच्या काळाची गरज आहे की सुंदर दिसण्यापेक्षा चांगलं वागण्याकडे कल असावा.

- स्वलिखित -डॉ सुजाता फड (BAMS)

Post a Comment

0 Comments