अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आवर्तन ची मासिक संगीत सभा ऑफलाइन
शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी सुरू झालेल्या आवर्तन मासिक संगीत सभेला 78 महिने पूर्ण झाले आहेत . कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ऑनलाइन पर्याय वापरून एकही मासिक संगीत सभा खंडित न होऊ देता अभिजात शास्त्रीय संगीतात आपला एक वेगळा ठसा आवर्तने उमटवला आहे. यासाठी अनेक कलावंतांचे व रसिकांचे योगदान मोलाचे ठरले. या कोरोनाच्या महामारी मध्ये जवळपास मागील 17 ते 18 महिने झाले समोर बसून शास्त्रीय संगीताची प्रत्यक्षात मैफिल ऐकण्याची इच्छा असूनदेखील ऐकता आले नाही. परंतु आज आम्हाला आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि ही 79 मासिक संगीत सभा रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 : 30 वाजता गणेश हॉल अष्टविनायक मंदिर या ठिकाणी आम्ही ऑफलाइन आयोजित केली आहे. या संगीत सभेचे पुष्प गुंफणार आहेत मुंबई येथील प्रसिद्ध युवा गायिका सूरमणी भाग्यश्री देशपांडे त्यांना तबला साथ श्री.संजय सुवर्णकार व संवादिनी साथ प्रा.शशिकांत देशमुख करणार आहेत
याच कार्यक्रमामध्ये लातूरच्या संगीतक्षेत्रातील काही गुणी कलावंतांचा सत्कार आयोजित केला आहे यामध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सचिव पदी नियुक्त झाल्याबद्दल लातूर येथील गायक कलावंत डॉ. देवेंद्र कुलकर्णी व आर्ट्स बिट्स
फाउंडेशन कडून दिला जाणारा 2021 सालचा युवा कला गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल लातूर मधील तबलावादक कलावंत श्री.गणेश रामजी बोरगावकर यांचा सत्कार आयोजित केला आहे. या संगीत सभेला आपण सर्व रसिकांनी येऊन मैफलीचा रसास्वाद घ्यावा असे आवाहन आवर्तन परिवाराच्या वतीने केले आहे

0 Comments