कधी कधी निसर्ग खूप काही चांगल्या गोष्टी असो किंवा शेतकरी राजाला इतका आनंद देतो की त्यांचा आंनद हा गगनात मावेनासा होतो.मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा पैकी अन्न ही गरज हा फक्त शेतकरी भागवू शकतो. आणि याच कष्टकरी शेतकऱ्यांवर आपलं अन्न अवलंबून असतो.बाजारात जो माल ,जे धान्य येते ते फक्त यांच्या कष्टमुळे च शक्य होते. माणूस आयुष्यभर धडपड करतो ,कष्ट करतो ,कमावतो आणि फक्त पुढे जायचा प्रयत्न करतो .परंतु कधी जगतो कशावर हा कधी विचार केला आहे का?? जीवनात कितीही पैसाने माणूस मोठा झाला तर जगण्यासाठी हे अन्न च सेवन करावे लागते.ज्या व्यक्तीला याची किंमत कळेल तो व्यक्ती नक्कीच स्वतः साठी जगण्याचा प्रयत्न करेल...! मग काय तीन ऋतू मध्ये कोणाला आवडणारा ऋतू असेल तर कोणाला आवडणारा ऋतू नसेल तो पाऊसाळा. हाच पाऊस कधी शेतकऱ्यांसाठी सोनं बनतो तर कधी अतिवृष्टी झाल्यास हातात फक्त माती आणि नुकसान देतो. हे नुकसान भरपाई कशाने भरून येत नाही ना कोणी पाहून जाणारे मंत्री तंत्रि भरून देतात. हा फक्त देखावा की पाहणी करणे आणि फुकटचे सल्ले देणे. जो शेतकरी कर्ज काढून पेरणी करतो जेव्हा अतिवृष्टी मुळे नुकसान होते तेव्हा मात्र शेतकऱ्यांना एकच पर्याय उरतो तो म्हणजे आत्महत्या. अगदी हे चुकीचं आहे कारण हा शेवटचा पर्याय नाही जीवन संपवण्याचा.अनेक शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात आणि आत्महत्या करतात. या वर्षी मात्र असंच काही केलं आहे पावसाने.जेव्हा पाऊसाची गरज असते तेव्हा लोकं लोक आकाशाकडे वर पाहतात आणि देवाला प्रार्थना करतात.तेव्हा मात्र पाऊस साथ देत नाही आणि या वर्षी उलट झालं. हाच पाऊस इतका जास्त झाला की शेतकरी च जीवन जगण कठीण केलं आहे.पिकांची नासाडी झाली.खूप नुकसान झाल आणि याची भरपाई दयायला कोणीच तयार नाही.सोयाबीन ही पाण्यात वाहून गेली आणि इतकी खराब झाली की जागीच तुटून पडली.सगळे शेतकरी चिंतेने ग्रस्त आहेत. भाजीपाला च्या बाबतीतही असंच घडलं.भाव चांगला मिळेल या आशेने लावलेला टोमॅटो, आवरा ,पालक इतका स्वस्त झाला की शेतकऱ्यांनि तो काढलाही नाही.काढून त्यांचा खर्च निघणं शक्य नाही आणि जिथे भाजीपाला पाठवायचा आहे तिथले गाडीच भाडं सुद्धा निघणार नाही.या कारणांमूळे भाजीपाला टाकून दिला आणि शेतात तसाच पडून राहिला.कंटाळून ते पीक काढून शेतकऱ्यांनी दुसरे पीक घेतले. निसर्ग कधी चक्र फिरवेल याचा अंदाज काही सांगता येत नाही.यया वर्षी असच घडलं.पावसाने साथ दिली नाही तर अतिवृष्टीमुळे नुकसान केले. दरवर्षी आतुरता असणारा पाऊस हा या वर्षी नकोसा झालाय...!
- स्वलिखित-डॉ सुजाता फड (BAMS)

0 Comments