गुणकारी गुळवेल ( अमृता) कोरोनावर मात अनेकांना जीवदान

 गुळवेल हा अनेक नावाने ओळखला जातो .परंतु आपल्याला माहीत असणारी ही दोनच नाव अमृता ,रसायनी ,अमृतवल्ली,मधूपर्णी,  ज्वरारी इत्यादी  नावाने ओळखली जाते.

गुळवेल हा दोन प्रकारचा असतो.
गुळवेलाची  हिरवी वेल असते.आणि लांब  पसरलेली असते.ही आयुर्वेदीक वनस्पती आहे.
1 आंबाच्या  झाडावर 
     यावर पसरलेली  गुळवेल थोडीशी तुरट  चवीची असते .
2  कडू लिंबाच्या झाडावर
    यावर पसरलेली गुळवेल ही जास्त कडू असते.
दोन्ही वृक्षावर आलेली  गुळवेल ही सारख्या गुणधर्माची असते  आणि सगळ्या आजारावर काम करते .
 
बघता बघता 2 वर्ष ओलांडून गेली .आपल्या देशावर कोरोना महामारी च संकट कोसळले. अनेकांची जीव गेली तर अनेकांची घर बंद पडली.परंतु ज्यांना या आयुर्वेदिक वनस्पती च महत्व माहीत आहे अश्या  अनेकांची जीव ही वाचली.
ही वनस्पती सप्तधातूंवर काम करते. कोरोना ची लक्षणे दिसताच आणि अगदी एच आर सिटी 10 ,15,20  स्कोवर असणाऱ्या  रुग्ण देखील घरगुती उपचार आणि  गुळवेल चा काढा  पिवून अनेक रुग्ण चांगले झाले आहेत.

गुळवेल मिळतो कुठे?

शेतामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला असणारे  कडू लिंबाचे झाडावर आणि अंबाच्या झाडावर गुळवेल असतो.
लोकांना गुळवेल काय असतो हेच माहीत नव्हतं परंतु  कोरोना काळात लोकांना याचं महत्व समजले.
ग्रामीण भागातील लोकांना गुळवेल माहीत होता परंतु शहरी भागातील लोकांना याची उपयोग माहीत नव्हता.
परंतु कोरोना काळात शहरी भागातून  गुळवेल ला मागणी  वाढली आहे .
शहरी भागातील लोकं ग्रामीण भागात खेडोपाडी  गुळवेल च्या शोधात येत आहेत .
अगदी सरकारी दवाखान्यात  देखिल  रुग्णांना गुळवेल चा काढा दिला जायचा.


गुळवेल चा वापर कसा करावा??
 कांड आणि पत्र 
या दोन्ही चा वापर करता येतो .
गुळवेलाची साल  आणि पान दोन्हीचा वापर करता येतो.ज्याना काढा करणं शक्य आशा लोकांनी  पान देखील चावून खाल्ले तरी अनेक आजारावर काम करते.
साल ही ताजी साल  असेल तर उत्तम आणि ज्यांना मिळत नाही त्यांनी  साल ही वाळवून ठेवली तर  1-2  वर्ष टिकते.

गुळवेल चे आरोग्यदायी फायदा.

गुळवेल सप्तधातुवर काम करते त्यामुळं असा कोणता आजार नाही की त्यावर ही काम करत नाही.
 १    अंग गरम झालं असेल आणि ताप वाढत असेल तर              गुळवेल चा काढा घेतल्यास कमी होते.
2   सतत नाकाला पाणी येणं , सर्दी वर चांगलं काम करते.
3   भूक लागत नसेल  ,अशक्तपणा जाणवत असेल तर याच्या सेवनाने आराम मिळतो आणि पचनसंस्था सुधारतो.
4   आमल्पितवर कमी करते.
5  कावीळ ,मलेरिया , डेंगू वर फायदेशीर ठरते.
6 अतिसारात मदत करते.
7 श्वसनाचे विकार दम लागणे, गळ्यातून सु सु आवाज येण
  हे विकार ही कमी करते.
8 चिकणगुणिया  सांधे दुखी अंग दुखणे कमी करते.
9 सर्वात महत्वाचं म्हणजे रोगप्रतिकार क्षमता वाढवते.
10  कोरोना मध्ये 100 टक्के प्रभावी करते.

 डॉ सुजाता फड
 BAMS

Post a Comment

0 Comments