चौसाळा येथे स्व . दादासाहेब काळमेघ स्मृतीदिनाचे आयोजन



दि .२९ जूलै , स्व . वा . मो . उपाख्य दादासाहेब काळमेघ यांची चोवीसावी पूण्यतिथी. दादासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देणारा दिवस. लाख वादळे झेलता झेलता स्वतःच एक अजिंक्य वादळ बनलेला माणूस म्हणजे दादासाहेब . सातपूड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या चौसाळा या गावात अतिशय गरीब कुटूंबात जन्माला आलेल्या दादासाहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर अनेक उंच शिखरं गाठून शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं . कोणत्याही प्रकारचं आर्थिक व राजकिय पाठबळ नसताना  स्वकर्तृत्वावर दादासाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले . श्री शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या एका मोठ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी दादांची दोनदा निवड झाली . शिस्तप्रिय स्वभाव व कर्मठ वृत्ती असणाऱ्या दादांनी आपल्या या पदांचा उपयोग गोरगरीब व सामान्य कुटूंबातील विद्यार्थी घडविण्यासाठी केला तसेच विदर्भामध्ये अनेक शिक्षण संस्था उभारण्यामध्ये दादांनी मोठा वाटा दिला . अनेक गरजवंताना दादांनी नोकऱ्या देवून पोटाला लावलं. त्यांच्या या समाजाप्रती असणाऱ्या भावनेतून दादांच्या मागे एक मोठा जनसंग्रह उभा राहीला .
अशा या जननायक व्यक्तीमत्वाचे पूण्यस्मरण होण्यासाठी दादासाहेबांनी स्थापन केलेल्या चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालय व कमवि चौसाळा येथे दादांच्या पूण्यतिथी दिनाचे आयोजन करण्यात आले . यावेळी श्री सुबोध काळमेघ यांनी भाषणातून विस्तृतपणे  स्व . दादासाहेब काळमेघ यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या कु .पी.एन. गावंडे मॅडम होत्या तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा . श्री कहाणे सर, काळे सर, पर्यवेक्षक श्री तायडे सर, सुबोध काळमेघ सर, वाठ सर, चौखंडे सर, श्री देशमुख सर, कु .कंकाळे मॅडम, कु . दातीर मॅडम, लिपीक श्री वासनिक , वार्ताहार रवी ढोके, माजी विद्यार्थी अक्षय सुरेंद्र काळमेघ व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments