लातुर शहरातील वाहतूक व्यवस्था पुर्णतः कोलमडली; अपघातांचे प्रमाण वाढले, पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष देण्याची गरज



लातूर | शहर प्रतिनिधी : गेल्या महिनाभरापासून लातूर शहरात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जॅम वाढले आहे, वाहतूक व्यवस्था पुर्णतः विस्कळीत झाली असून लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांनी खरंच स्वतः लक्ष द्यावे अशी लातूरकरांची लोकभावना आहे.

भरधाव मोटारसायकल चालवणाऱ्या विकृत मोटारसायकलस्वारांची संख्या फोफावली

हल्ली भरधाव मोटारसायकल चालवणाऱ्या विकृत लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वाहतूक पोलिसांच्या डोक्याला ताप झाला आहे. अशा लोकांच्या भरधाव वेगाने मोटारसायकल चालवण्याच्या विकृतीला वेळीच पायबंद बसला तर भविष्यात होणारे अपघात टळतील, शहरात सीसीटीव्ही कॅमेरामार्फत आशा लोकांवर नजर ठेऊन त्यांच्यावर मोठ्यात मोठी कठोर कारवाई करायला हवी जेणेकरून होणाऱ्या अपघातांवर वेळीच आळा बसेल व अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

मद्यपान तपासणी पोलिसांच्या वतीने सक्तीची करावी

शहारत मद्यपान करून दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहन चालक यांनी मद्यपान केले आहे किंवा नाही याची तपासणी सक्तीने वाहतूक पोलिसांनी करायला हवी, मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्यामुळे अपघात वाढत आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. लातूर शहरात वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे, सध्या कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांची संख्या अल्प प्रमाणात असल्याचे भासते, पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलीसांचे संख्याबळ वाहतूक व्यवस्था मजबुतीकरण करण्यासाठी प्रथम प्रधान्याने वाढवले पाहिजे अशी लातूरकरांची लोकभावना आहे.



प्रत्येकाला हेल्मेट सक्ती करा; अन्यथा जागेवर दंड करा

शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी, भरधाव चालवणारे माथेफिरू, मद्यपान करून वाहन चालक यांच्याकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, दुचाकीस्वरांना हेल्मेट सक्ती ही वाहतूक पोलिसांनी करायला हवी व ही प्रत्येक वाहन चालकाची स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गरजेचे आहे. जेणेकरून अपघात झाल्यास प्राण वाचतील.

एकूणच लातूरची कोलमडलेली वाहतूक व्यवस्था सुरुळीत व मजबुत करण्यासाठी स्वतः पोलीस अधिक्षक यांनी लक्ष द्यायला हवे अशी लातूरकरांची लोकभावना आहे.

Post a Comment

0 Comments