![]() |
| संभाजी ब्रिगेडच्या तालुका कार्याध्यक्षपदी ॲड.प्रशांत पवार यांची निवड |
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने रविवार, दिनांक १८ जुलै रोजी अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्षपदी ॲड.प्रशांत मुकुंदराव पवार यांची निवड करण्यात आली.यावेळेस बोलताना जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांनी संभाजी ब्रिगेड पक्ष हा बीड जिल्ह्यात पूर्ण ताकदीनिशी आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका लढविणार आहे अशी माहिती दिली. संभाजी ब्रिगेड बीड (पूर्व) च्या पदाधिकारी निवडीबाबत शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक परीसरातील अनुसया कॉम्प्युटर्स हाॅल मध्ये रविवार,दिनांक १८ जुलै रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन संभाजी ब्रिगेड बीड (पूर्व) चे जिल्हाध्यक्ष प्रविण उत्तमराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के,संभाजी ब्रिगेड शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुहास माने,मराठा सेवा संघ वसतिगृह कक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.या बैठकीस संभाजी ब्रिगेडचे नवनिर्वाचित अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष ॲड.प्रशांत मुकुंदराव पवार,तालुका सचिव प्रा.राम ढोबळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब धुमाळ,मार्गदर्शक नारायणराव मुळे,बापू इंगळे,रितेश वाघमारे,अमोल संगवे सर,सोनवणे सर,परमेश्वर मिसाळ,घोरपडे सर,सुमीत वेडे आदींची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांकडून राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनेनंतर नविन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देवून निवड करण्यात आली.याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे म्हणाले की,बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडला शहरी व ग्रामीण भागात तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाई,परळी व केज तालुक्यातील अनेकजण ब्रिगेडकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे,महासचिव सौरभदादा खेडेकर,कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक डॉ.बालाजी जाधव, प्रदेश संघटक प्रा.सुदर्शन तारख, प्रदेश संघटक अतुल गायकवाड, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य शशिकांत कन्हेरे,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष ॲड.राहुल वायकर यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार पूर्ण ताकदीनिशी आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका लढविणार आहे.तरी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांनी केले.तर नुतन तालुका कार्याध्यक्ष ॲड.प्रशांत पवार यांनी निवडीनंतर बोलताना प्रथम आभार मानले, पुढील काळात मिळालेल्या जबाबदारीनुसार अंबाजोगाई शहर व तालुक्यात जिल्हाध्यक्ष ठोंबरे सर व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी ब्रिगेड वाढविण्यासाढी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे तालुका कार्याध्यक्ष ॲड.पवार म्हणाले.याप्रसंगी मराठा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष रामकिसन मस्के,संभाजी ब्रिगेड शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुहास माने यांनीही मनोगत व्यक्त केले.या बैठकीचे सूत्रसंचालन नानासाहेब धुमाळ यांनी केले.तर प्रास्ताविक नारायणराव मुळे यांनी करून उपस्थितांचे आभार बापू इंगळे यांनी मानले.


0 Comments