संगीताचा सूर हरवला.



संगीताचा सूर हरवला. 

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे 93 व्या वर्षी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास त्यांनी घेतला.

सर्व अवयव निकामी झाल्याने डॉक्टरांनी स्पष्ट केले. 

आशा भोसले यांना हिंदी सिने सृष्टीची वर्स्टाईल स्टाईल गायिका म्हणून ओळखले जायचे. 

त्यांनी केवळ हिंदी भाषे मध्येच नाही गाणी गायली तर मराठी, तमिळ ,गुजराती, तेलगू ,रशियन, नेपाळी, मल्याळम, तमिळ, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये आपल्या गायनाचा प्रभाव पडलेला आहे.

त्यांनी महाराष्ट्र भूषण सारखे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत.

आशा भोसले यांचा जन्म आठ सप्टेंबर 1933 साली सांगली येथे झालेला आहे.

त्यांनी गायला खूप कमी वयात सुरुवात केली.

आशाताई कधीच थकलेल्या नव्हत्या भोगल्या दुःखाला सुख म्हणून जगत राहिल्या आणि समोरच्याला देखील आनंद देतच राहिल्या. 

आशाताई या वयातही हरल्या नव्हत्या सकाळपर्यंत त्यांनी झुंज दिली पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 

आशाताईंच्या हरकती ,मुरक्या, ताना इतक्या कमाल आहेत की त्यातली सौंदर्य स्थळे ही काश्मीरच्या सौंदर्य स्थळालाही लाजवतील अशा आहेत कोणत्याही शास्त्रीय संगीतातली गायिका ते ऐकून आनंदीच होईल तसं गाऊ शकणार नाही असे मला वाटते.

आशा भोसले यांची नक्कल करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण त्यांना ते शक्य झाले नाही. 

सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे. त्यांनी एक नाही दोन नाही तब्बल वीस वेगवेगळ्या भाषांमध्ये 12 गाण्याचा अधिक गाणी गाण्याचा विक्रम केलेला आहे.

यासाठी त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे.

एका पॉडकास्ट मध्ये त्यांनी आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली. हा व्हिडिओ अत्यंत लोकप्रिय झाला. या व्हिडिओवरून त्यांची शेवटची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. की गाता गाता मला मरण यावे. यावरून त्यांचे गाण्यावर किती प्रेम आहे हे स्पष्ट होते. 

आता माझ्याकडे शिकण्यासारखे काही राहिले नाही. गेली 80, 82 वर्षे मी सिने सृष्टीत व्यतीत केलेली आहे. आणि आता शेवटची एक इच्छा आहे की मी जगाचा निरोप घ्यावा तेही गाता गाता. तर मी सर्वाधिक प्रिय होईल.

संगीताच्या जगात दुसरी कोणी लता तर बनू शकते पण आशा बनणे अशक्य गोष्ट आहे. 

असे विधान स्वर साम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत म्हटलेले होते.

एकाच या जन्मी जणू  

फिरूनी नवी जन्मेन मी 

हरवेन मी, हरपेन मी 

तरी ही मला लाभेल मी.

हे सूर कायम हृदयात राहतील.


श्रुती पवार. महाराष्ट्र रत्न.

Post a Comment

0 Comments