» पुणे । प्रतिनिधी:
संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे ‘महाराष्ट्राचा महागायक २०२६’ ही राज्यस्तरीय खुली फिल्मी गीत गायन स्पर्धा येत्या २० मार्च रोजी पुण्यात भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. सूर्या फिल्म्स, मुंबई आणि विश्वनाथ फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रभरातील गुणी गायक-गायिकांना आपली कला सादर करण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. फिल्मी गीतांच्या माध्यमातून आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांसाठी ही स्पर्धा सुवर्णसंधी ठरणार आहे.
राज्यभरातून स्पर्धक सहभागी होणार असून या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.ही स्पर्धा खुल्या प्रकारची असून राज्यातील सर्व इच्छुक गायक-गायिका सहभागी होऊ शकतात. मात्र प्रवेशासाठी 5,000 रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
आयोजकांच्या मते, या स्पर्धेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील नवोदित तसेच अनुभवी गायकांना व्यावसायिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना पुढील संधींसाठी तयार करणे हा आहे.‘महाराष्ट्राचा महागायक’ या नावाप्रमाणेच ही स्पर्धा केवळ गायनापुरती मर्यादित नसून, स्पर्धकांच्या आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि मंचावरील व्यक्तिमत्त्वाचा कस पाहणारी ठरणार आहे. स्पर्धकांना चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याने या कार्यक्रमाकडे राज्यभरातील संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे. पुणे शहरात होणाऱ्या या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक वातावरण अधिक रंगणार असून संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 7030907069 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.‘महाराष्ट्राचा महागायक २०२६’ ही स्पर्धा केवळ एक कार्यक्रम नसून, महाराष्ट्रातील संगीत प्रतिभेला प्रोत्साहन देणारा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरणार आहे. राज्यातील उदयोन्मुख गायकांसाठी ही संधी भविष्यातील कारकिर्दीची दारे उघडणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
*****



0 Comments