हास्य दिन



नुकताच सहा जानेवारीला हास्य दिन होऊन गेला. त्यानिमित्ताने 

हसणे माणसाला उभारी देतो आनंद देतो. हे प्रत्येकालाच जाणवते. कितीही दुःख असले आणि हसण्याचा प्रसंग आला तर माणूस खळखळून हसतो. 

आयुष्याला कलाटणी देणाऱ्या आणि प्रसन्नता देणारा असा हास्य दिन नुकताच झाला. 

त्यानिमित्ताने हा लेख. 

माणूस का बर हसतो असा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का? 

तर विनोद झाला तर आपण हासतो. जेव्हा आपल्या मनाजोग्या गोष्टी घडतात तेव्हाही माणूस हसतो. आणि आनंद व्यक्त करण्यासाठी ही हसतो. असे अनेक हास्याचे प्रकार आहेत.

विनोद झाला तर बऱ्याच लोकांना तो लगेच कळतो तेव्हा आपण हसतो. काही लोकांना उशिरा कळतो तेव्हा ते हसतात तेव्हा त्यांच्याबरोबर आपणही हसतो. शेवटी काय तर विनोद हा कळला पाहिजे. 

काहींना लगेचच कळतो काहींना उशिरा करतो एवढाच फरक आहे. 

खळखळून हसणे हे आणि आनंदी राहणे आयुष्याचे रहस्य आहे.

बऱ्याच वेळा अनेक व्यक्ती विनोद होऊन सुद्धा हसत नाही. आणि काही व्यक्ती काहीही विनोद नसतो तरीही उगीचच हसत राहतात. 

असे दोन प्रकारचे वेगवेगळे टोकं आपल्याला बघायला मिळतात. 

माणसाची व्याख्या करताना हसणारा प्राणी अशी केली तर काही वावगे ठरू नये. 

मनुष्य प्राण्यांमध्ये फक्त माणसं हसतात.

आपण पाहिले आहे का कधी की प्राणीही हसतात. तर नाही प्राणी हसत नाही. जर असे घडले तर आपण नक्कीच घाबरून जाऊ. 

आपण हसण्याचे फायदे बघू या. 

1 मोकळेपणाने हसणे. 

काही मोठा विनोद झाल्यावर खळखळून हसणे आणि मोकळेपणाने हसणे. शास्त्रज्ञांनी यावर शोध केला असता. हसणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

2 खूप गंभीर काही लोक असतात की ते प्रत्येक गोष्टीचा फार विचार करतात. अशावेळी अशा लोकांना जर आपण खळखळून हसवले तर त्यांच्या डोक्याचा ताण कमी होतो आणि ते मोकळेपणाने हसतात. 

3 हृदयाचे आरोग्य देखील खळखळून हसल्याने चांगले राहते. हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. 

4 श्वसनाचा त्रास होत नाही. श्वसन विकार हा होत नाही खळखळून हसल्यामुळे. 

5 मानसिक आनंद खूप मिळतो. 

आपण रस्त्याने जात असताना समोरून व्यक्ती आल्यानंतर रोज रोज आपण भेटत असून चालताना तर आपण हसतो. त्यामुळे मानसिक आनंद हा प्रत्येकाला मिळत असतो. 

काही लोक उगीचच हसत असतात. त्यांना आपण नाव ठेवतो. पण ते योग्य नाही. कारण हसत राहणे आणि मन मोकळेपणाने जगणे खूप महत्त्वाचे आहे. 

त्यामुळे फील गुड हार्मोन्स नैसर्गिक वेदनाशामक अशी वेदना कमी करण्यासाठी आणि आनंदाची भावना निर्माण करण्यासाठी हे कार्य करत असतात. 

थोडक्यामध्ये हसणे आणि एखादा पौष्टिक पदार्थ चविष्ट गोड आंबट गोड एखादा विनोद झाल्यानंतर एवढे खाल्ल्यासारखे वाटते. 

गोड तुमचे आरोग्य सुधारतो आणि आपल्याला गोडवा आवडतो तसेच हास्यही आपल्याला सगळ्यांना आवडायला हवे. 

काही लोकांचे चेहरे अगदी मख्ख असतात. त्यांच्या चेहऱ्यावरची माशी ही उडत नाही असे काही जण म्हणतात. 

परंतु काही मात्र सतत हसतमुख आणि प्रसन्न असतात. की जे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील आनंदी ठेवतात अशा खळखळून हसणाऱ्या व्यक्ती आणि आनंदी राहणारे व्यक्ती सगळ्यांनाच आवडतात. 

जेव्हा माणूस हसतो तेव्हा आपोआपच नकारात्मक गोष्टींचा नाश होत असतो. 

हसणाऱ्या व्यक्तींचा चेहरा हा प्रसन्नच असतो. आणि त्यांची मैत्री देखील सगळ्यांशी पटापट होते. 

तसे गप्प राहणाऱ्या व्यक्तींची आणि मक्ख व्यक्तींशी मैत्री पटकन कोणाची होत नाही.

पुरुषांपेक्षा स्त्रिया या जास्त हसतात आणि आनंदी देखील राहतात असे निदर्शनास आले आहे. 

म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा आनंदी राहा आणि खळखळून हसा. तरच हास्य दिन हा खऱ्या अर्थाने सार्थ होईल असे वाटते. 

श्रुती पवार_जगताप. महाराष्ट्र रत्न.

Post a Comment

0 Comments