मुंबई (प्रतिनिधी) – समाजात प्रेरणा, कार्यतत्परता आणि सकारात्मक बदलाचे अधिष्ठान निर्माण करणाऱ्या संदीप दादा थोरात यांना “लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025” ने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यातून सामाजिक, शैक्षणिक आणि मानवी मूल्यांचा ठसा उमटविणाऱ्या या व्यक्तिमत्वाचा सन्मान सर्वदूर होत आहे.
हा भव्य सन्मान सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालय समोर येथे 28 ऑक्टोबर 2025, मंगळवार रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन क्रांती ग्राम विकास संस्था व विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक श्री. सुरेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत व भव्य आयोजन झाले. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मा. ओमप्रकाश शेटे साहेब, अध्यक्ष – आयुष्मान भारत मिशन समिती, महाराष्ट्र राज्य, अभिनेत्री अलकाताई कुबल,अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, तसेच सिनेअभिनेते रोहित कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा — समाजसेवक, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार, उद्योजक, शैक्षणिक मार्गदर्शक, पर्यावरण कार्यकर्ते, तसेच कलाक्षेत्रातील व्यक्तींचा “लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार 2025” ने सन्मान करण्यात आला. थोरात यांनी आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, समाजातील जनजागृती, नवकल्पक दृष्टीकोन आणि जनसंपर्कातील कार्यतत्परतेमुळे हा सन्मान मिळवला. त्यांच्या कार्यामुळे समाजात प्रेरणादायी बदलांची नवी दिशा निर्माण झाली आहे. कार्यक्रमात सुहासिनी केकाणे, सुरज भोईर, के. रवी, अन्विता दास, मनोज देसाई आदी मान्यवर उपस्थित राहून सन्मानार्थींना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याचे विशेष सहकार्य नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) संलग्न क्रांती ग्राम विकास संस्था, बीड यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रभरातील गुणवंत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम प्रेरणादायी आणि गौरवशाली ठरला. सन्मान सोहळ्यात मानपत्र, ओळखपत्र, सन्मानचिन्ह, अभिनंदन पत्र व भेटवस्तू देऊन पुरस्कृत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर पाहुण्यांनी संदीप थोरात यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे संदीप थोरात यांच्या कार्याला नवचैतन्य आणि नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांनी समाजहित, कौशल्यविकास आणि सकारात्मक बदलासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला

0 Comments