वृत्तपत्र विक्रेता दिन - श्रुती पवार


वृत्तपत्र विक्रेत्यांचा मानसन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 15 ऑक्टोबर हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टर ए .पी . जे. कलाम यांचा वाढदिवस असतो आणि त्यास निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यां विषयी आदर व्यक्त करण्यात येतो.  यानिमित्ताने त्यांना कृतज्ञता व्यक्त करून समाजातील योगदान आणि कष्टाची जाणीव ठेवण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो.  डॉक्टर कलामांचा सन्मान . डॉ. ए.पी.जे. कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा होत असल्यामुळे त्यांच्या कार्याला आणि त्यांनी केलेले सामाजिक योगदान हे स्मरणात ठेवले जाते. वृत्तपत्र विक्रेते सकाळी चार वाजताच उठतात. ऊन असो पाऊस असो पण त्यांना पेपर हे पोहोचवावे लागतात. पावसाळा असो किंवा हिवाळा असो ऋतू मनात बदल जरी झाले तरी वृत्तपत्र विक्रेत्यांना दिनचर्येमध्ये कोणताही बदल होत नाही. कोरोनाच्या काळात सुद्धा सर्वजण घरात बंदिस्त झालेले असताना देखील वृत्तपत्र विक्रेते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत होते.  भल्या पहाटे उठून वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असेल किंवा पूर्वनियोजित जागेवर सर्वजण ठरलेल्या वेळे जमतात. वृत्तपत्र घेऊन गाडी दाखल झाले की त्यावर विक्रेत्यांच्या एकच उड्या पडतात. नियमितपणे हा शिरस्ता जपणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा येतोच सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑक्टोबर होय माझी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे कलाम यांचा जन्मदिवस हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा होत आहे.  वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा आमच्या कष्टाचा गौरव करणारा अभिमानाचा दिवस असल्याचा भावना विक्रेत्यांनी व्यक्त केलेल्या आहेत.  वृत्तपत्र विक्रेत्याला  समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त केलेली आहे.  समाजातील या घटकाला देखील मानसन्मान मिळावा या दृष्टीने हा दिन साजरा केला जातो. 

श्रुती पवार. महाराष्ट्ररत्न.

Post a Comment

0 Comments