पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथिल संदीप माधवराव पाटील यांची पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुलाखती व त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये निवड समितीने संदीप पाटील यांना त्यांची पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याचे पञ देण्यात आले आहे संदीप पाटील हे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येत तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विद्यमान खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ तालुका पातळीवर गावोगावी काँग्रेस पक्षाची विचार सरनी व समाजकार्य पोहचवली असून पक्षाचे काम प्रामाणिक पणे काम केल्याने संदीप पाटील यांना पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या या निवडी नंतर माझी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूर लोकसभा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या


0 Comments