न्यु इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी एमबीबीएस साठी पात्र


अंबाजोगाई (वार्ताहर): येथील माईर एम.आय.टी. पुणे संचलित न्यु इंग्लिश स्कूल, गुरुवार पेठ शाळेचा विद्यार्थी सफवान खुर्शीद अहमद शेख हा नीट परीक्षेमध्ये 553 गुण घेऊन मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेशास पात्र झाला आहे. स्वतःचा आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या बळावर त्याने एम.बी.बी.एस.चे स्वप्न साकार केले. लातूर येथील आर.सी.सी. प्रा.  मोटेगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करत त्याने हे यश संपादन केले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने सफवानचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश भस्मे सर, आरसीसी क्लासचे मॅनेजर श्री घुगे सर व प्रा. ढोबळे सर, सफवानची आजी,शिक्षकवृंद हे उपस्थित होते.या यशाबद्दल एम.आय.टी. संस्थेचे संस्थापक डॉ.प्रा. विश्वनाथ कराड सर, कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी संचालक श्री. राजेश कराड, प्रशासकीय अधिकारी सौ. शुभांगीताई कराड, संचालक श्री संगप्पा बनदवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेश भस्मे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments