शंभर टक्के निकालाची न्यु इंग्लिश स्कूलने राखली परंपरा



अंबाजोगाई (वार्ताहर): येथील गुरुवार पेठ शाळेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मागील काही वर्षांची ही परंपरा आजही कायम विद्यार्थ्यांनी ठेवल्याचा आनंद झाला.
 चि. रुपेश जाधव (94.20) ने शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. द्वितीय स्थानी कु.भक्ती साठे (90.20),  तृतीय कु. श्रुती पटाईत (89.20), चतुर्थ स्थानी चि. यासिर कुरेशी(87,60) तर पाचव्या स्थानी चि.स्मितेश गायकवाड (79.60)असे शाळेतील टॉप फाईव्ह विद्यार्थी राहिले. 
या यशाबद्दल एम.आय.टी. संस्थेचे संस्थापक डॉ.प्रो. विश्वनाथ कराड सर, कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल कराड, अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी संचालक श्री. राजेश कराड, प्रशासकीय अधिकारी सौ. शुभांगीताई कराड, संचालक श्री संगप्पा बनदवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेश भस्मे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments